अंधेरी येथील भवन्स महाविद्यालयाचा ‘निसर्ग महोत्सव’ २९,३० व ३१ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. निसर्ग प्रेमींसाठी ही चांगली संधी असून यावेळी आयुर्वेदीक वनस्पतींचे प्रदर्शन, प्राणी बचाव व त्यांचा सांभाळ कसा करता येईल याबाबत मार्गदर्शन, फुलांचे प्रदर्शन, श्वान प्रदर्शन, निसर्ग व वन्यजीव छायाचित्रांचे प्रदर्शन, लोकसंगीत, नृत्य, बोलक्या बाहुल्यांचे कार्यक्रम, पर्यावरणासंबंधित चित्रपट, आदी अनेक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. याशिवाय या महोत्सवात नृत्य, चित्रकला, पथनाटय़, उत्स्फुर्त छायाचित्र अशा अनेक स्पर्धादेखील असणार आहेत. याशिवाय उत्कंठा वाढवणारे साहसी प्रयोगही यावेळी विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने निसर्ग प्रेमींना एकत्र येण्यासाठी एक व्यासपीठ तयार झाले आहे.
रुपारेलचा अर्थोत्सव
डी.जी. रुपारेल महाविद्यालयाचा अर्थशास्त्र विभागाचा अर्थोत्सव व आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा ४ ते ६ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये पथनाटय़, निबंध, ट्रेजर हंट, छायाचित्र अशा अनेक स्पर्धा होणार असून या महोत्सवाचे मुख्य आकर्षण हे व्हच्र्युलट स्टॉक मार्केट असणार आहे. जुन्या पद्धतीचे पद्धतीनुसार शेअर बाजारात चालणारे व्यवहार या स्पर्धेच्या निमित्ताने विद्यर्थ्यांंना अनुभवता येणार आहे. याशिवाय या कार्यRमात संसदीय चर्चा आयोजित केली असून संसदेप्रमाणे या स्पर्धेची आखणी असणार आहे. छायाचित्रण स्पर्धेमध्ये महाविद्यलयाची भोवती उत्स्फुर्त विषय देऊन त्यानुसार योग्य छायाचित्राला पारितोषिक दिले जाईल.
खबऱ्या