या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वरळीतील एल. एस. रहेजा कला महाविद्यालयाचे वार्षिक कलाप्रदर्शन ३ ते ५ मार्च या कालावधीत महाविद्यालयात पार पडले. कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वर्षभरात केलेल्या कलाकृतींमधील सर्वोत्कृष्ट कलाकृती या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. या कलाकृतींमधून काही निवडक कलाकृतींना पारितोषिक दिले जाते. महाविद्यालयातील ‘व्हिज्युअल अ‍ॅण्ड कम्युनिकेशन आर्ट, डिजिटल फिल्ममेकिंग आणि डिजिटल आर्ट’ या विभागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर्षभरात केलेली कामे या प्रदर्शनात पाहता येणार आहेत. रहेजा स्कूलच्या दर्शनी भागावर विद्यार्थ्यांनी विविधरंगी ग्राफिक्स लावले होते. प्रदर्शनातील प्रत्येक कलाकृती सर्जनात्मक, चिकाटी आणि सर्वापलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या कुशाग्र बुद्धीची प्रचीती देणारी होती. ‘डिजिटल फिल्ममेकिंग’ विभागाने सादर केलेले लघुचित्रपट प्रेक्षकांची दाद मिळवून गेले. ज्यात या विषयातील सखोल अभ्यास आणि व्यावसायिकता दिसून आली. लघुचित्रपटांसाठी लागणारे दिग्दर्शन, संकलन, छायाचित्रण, कथा-पटकथा या तांत्रिक बाजू विद्यार्थ्यांनीच सांभाळल्या होत्या. ‘फॅशन टेक्नॉलॉजी’च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कल्पक डिझाइन्सनी उपस्थितांची वाहव्वा मिळवली. ‘फोटोग्राफी’ आणि ‘डिस्प्ले डिझायिनग’मधील अद्ययावत प्रक्रिया आणि तंत्रज्ञानाची झलक तृतीय वर्ष व्हिज्युअल आणि कम्युनिकेशन आर्टच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या कलाकृतीमध्ये दिसून आली.

मराठीतील सर्व कॅम्पसकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Collage event
First published on: 11-03-2017 at 00:34 IST