आजवर विविध सांस्कृतिक उपक्रमातून सम्यक कलांश प्रतिष्ठान आपलं नाव राखून आहे. कलेचा प्रचार, प्रसार व संवर्धन ह्य़ा उद्देशाने ना नफा ना तोटा या तत्त्वावर काम करत दिनांक १२ आणि १९ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत सम्यक कलांश प्रतिष्ठानअंतर्गत स्वरगंध विभाग आयोजित आवाजाची कार्यशाळा प्रभादेवीच्या पु. ल. देशपांडे अकादमी येथे यशस्वी पार पडली. सदर कार्यशाळेचे मार्गदर्शन प्रशिक्षक विशारद सचिन मोरे ह्य़ांनी केले. प्रत्येयदर्शी प्रशिक्षण ह्य़ा  कार्यशाळेचे वैशिष्टय़ होते. तब्बल २५ विद्याार्थी वेगवेगळ्या ठिकाणावरून ह्य़ाचा लाभ घेण्यास आले होते. वयोमर्यादा नसल्याने लहान ते थोर विद्यार्थ्यांचा सहभाग या कार्यशाळेत होता. स्वरगंध विभागाचे संचालक तसेच सम्यक कलांश प्रतिष्ठानचे सचिव सुनील शिगवण यांचे उत्तम व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे ठरले. पुढे अशा प्रकारच्या कार्यशाळांचे आयोजन यापुढेही सुरू  राहील व वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे आयोजन आम्ही करू, असे कार्यशाळेच्या सांगता समारोहात त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व कॅम्पसकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sound workshop
First published on: 25-02-2017 at 00:46 IST