बी. एफ. ए. अ‍ॅप्लाइड आर्ट तसेच फाइन आर्टमधील टेक्स्टाइल डिझाइन, इंटीरिअर डेकोरेशन, स्कल्प्चर, मेटल वर्क, सिरॅमिक्स, इ. विषयांच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांची तयारी कशी कराल, याविषयी..

सर्वसाधारणपणे दहावी ते बारावीच्या परीक्षा आटोपल्यानंतर तरुण विद्यार्थी आपले करिअर करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांची तयारी करू लागतात. चित्रकलेच्या विषयावर आधारित असणाऱ्या बी.एफ.ए. अ‍ॅप्लाइड आर्ट तसेच फाइन आर्टमधील टेक्स्टाइल डिझाइन, इंटीरिअर डेकोरेशन, स्कल्प्चर, मेटल वर्क, सिरॅमिक्स, इ. विषयांची प्रवेश परीक्षांची तयारी कशी करावी या विषयीची माहिती येथे देत आहोत.

खालील सर्व पदवी अभ्यासक्रमांचा कालावधी चार वर्षे (पूर्ण वेळ) आहे.

महाविद्यालयांची नावे :

१)    सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई. शासकीय महाविद्यालय : बी. एफ. ए. ड्राइंग पेंटिंग, बी. एफ. ए. टेक्स्टाइल डिझाइन, बी. एफ. ए. इंटीरिअर डिझाइन, बी. एफ. ए. स्कल्प्चर, बी. एफ. ए. मेटल वर्क, बी. एफ. ए. सिरॅमिक्स.

२)    सर जे. जे. इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅप्लाइड आर्ट, मुंबई. शासकीय महाविद्यालय : बी. एफ. ए. अ‍ॅप्लाइड आर्ट.

३)    शासकीय चित्रकला महाविद्यालय, नागपूर : बी. एफ. ए. अ‍ॅप्लाइड आर्ट, बी. एफ. ए. फाइन आर्ट.

४)    शासकीय चित्रकला महाविद्यालय, औरंगाबाद : बी. एफ. ए. अ‍ॅप्लाइड आर्ट, बी. एफ. ए. फाइन आर्ट, बी. एफ. ए. टेक्स्टाइल डिझाइन.

५)    रचना संसद कॉलेज ऑफ अ‍ॅप्लाइड आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट, मुंबई. खासगी विनाअनुदानित : बी. एफ. ए. अ‍ॅप्लाइड आर्ट.

६)    बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाइन आर्ट, सावंतवाडी, खासगी विनाअनुदानित : बी. एफ. ए. फाइन आर्ट.

७)    पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ अ‍ॅप्लाइड आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट, पुणे : बी. एफ. ए. अ‍ॅप्लाइड आर्ट.

खासगी विनाअनुदानित

८)    भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फाइन आर्ट, पुणे खासगी विनाअनुदानित : बी. एफ. ए. अ‍ॅप्लाइड आर्ट.

९)    विवा इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅप्लाइड आर्ट, विरार (पूर्व) खासगी विनाअनुदानित : बी. एफ. ए. अ‍ॅप्लाइड आर्ट.

वरील सर्व कॉलेजमधून ६०० विद्यार्थ्यांना हा पदवी अभ्यासक्रम करता येतो. प्रवेशाकरिता इच्छुक विद्यार्थ्यांना  केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतू पार पडावे लागते. त्याकरिता १२ वी आर्ट्स, सायन्स किंवा कॉमर्स कोणत्याही अभ्यासक्रमातून कमीतकमी ४५ टक्के व राखीव वर्गातील विद्यार्थ्यांकरिता ४० टक्के मार्क्‍स असावे लागतात.

परीक्षेचे स्वरूप

ज्या विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेत असताना इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा दिली आहे अशा विद्यार्थ्यांना ही परीक्षा विशेष कठीण वाटणार नाही. त्यानंतर गेली काही वर्षे, आम्ही चित्रे काढलीच नाहीत. किंवा ब्रश हातात घेतलाच नाही, असे म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांला मात्र या सीईटीची मनापासून प्रॅक्टिस करावीच लागते. परीक्षेसाठी १/४ आकाराचा चांगला कार्टीज पेपर पुरविला जातो. विद्यार्थ्यांनी ऌइ,2इ, 6इ पेन्सिल, रबर, वॉटर किंवा पोस्टर्स कलर्स, पाण्यासाठीचे भांडे, कलर पॅलेट इत्यादी आवश्यक गोष्टी स्वत:बरोबर न्यावयाच्या आहेत.

१)    ऑब्जेक्ट ड्रॉइंग- वस्तुचित्रण (प्रॅक्टिकल) : वेळ सकाळी १०.३० ते ११.३० वा.पर्यंत (५० मार्क्‍स) दिलेल्या नैसर्गिक वस्तू किंवा मनुष्यनिर्मित वस्तूचे नीट निरीक्षण करून त्याचे चित्र काढावे व ते पेन्सिलने शेड लाइटमध्ये रेंडर करावे. त्यामध्ये वस्तूची प्रमाणबद्धता व सुबक मांडणी याचा प्रामुख्याने विचार केला जातो.

२)    डिझाइन (टू डी) : वेळ दुपारी १२ ते १.३० वा.पर्यंत (५० मार्क्‍स) दिलेल्या विषयानुरूप लहानमोठय़ा वेगवेगळ्या आकारांची मांडणी करून टू डी डिझाइन तयार करायचे व ते जल किंवा पोस्टर रंगात रंगवावयाचे आहे. रंगाची विषयानुरूप निवड व उत्कृष्ट सफाईदार फिनिशिंग याला फार महत्त्व आहे.

अध्र्या तासाच्या सुट्टीनंतर

३)    ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा प्रश्नोत्तराचा सैद्धांतिक पेपर : वेळ दुपारी २ ते २.४५ वा.पर्यंत (४० मार्क्‍स) छायाचित्रे, क्राफ्ट, रंग तसेच कॉम्प्युटर ग्राफिक्ससंबंधी प्रश्न. उत्तरे देताना त्यासाठी अनेक पर्यायी उत्तरे दिलेली असतील. योग्य उत्तरावर फक्त खूण करावयाची आहे. उदा.

अ)अजंठा शिल्पे कुठे आहेत- उत्तर : महाराष्ट्र, गोवा, उत्तर प्रदेश

ब)    आगपेटीचा आकार- उत्तर : चौकोन, त्रिकोण, आयात

क)    कूल कलर्स म्हणजे- उत्तर : ग्रे, पिवळा, हिरवा

४)    मेमरी ड्रॉइंग : वेळ दुपारी ३.०० ते ४.३० (५० मार्क्‍स) दिलेल्या विषयाची वातावरणनिर्मिती करून ते जलरंग किंवा पोस्टर रंगात रंगवावे. या विषयात आपले परीक्षण व रंगसंगतीला महत्त्व दिले जाते. रंगीत पेन्सिलचा वापरदेखील मेमरी ड्रॉइंगसाठी करता येतो. या विषयात आपली कल्पनाशक्ती व्यक्तिचित्रण एकंदरीत मूढ व वातावरणनिर्मिती याचा विचार केला जातो.

वरील उल्लेख केलेली परीक्षा एकाच दिवशी घेतली जाते व सर्व मिळून १९० गुण असणाऱ्या या परीक्षेचे पेपर तपासून झाल्यावर गुणानुसार क्रमवारीची नोंद (मेरिट लिस्ट) तयार केली जाते. या निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी तयार करताना त्यात इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेतील ग्रेडप्रमाणे मार्क दिले जातात.

ए ग्रेड- १० मार्क्‍स, बी ग्रेड- ६ मार्क्‍स, सी ग्रेड- ४ मार्क्‍स.

याचाच अर्थ इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड जरी अपरिहार्य नसली तरी त्याचे महत्त्व कमी नाही.

१५ एप्रिलनंतर या परीक्षांचे फॉम्र्स ऑनलाइन व इतर माहिती ६६६.ं्रू३ी.ीं१ल्ली३.ल्ली३ या संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

एकदा गुणवत्ता यादी तयार झाल्यावर विद्यार्थ्यांना एक फॉर्म भरायचा असतो. त्यात आपल्याला कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा आहे याची आपल्या पसंतीप्रमाणे क्रमवारी लिहावयाची असते. प्रत्येक महाविद्यालयात किती ओपन सीट्स व किती जागा रिझव्‍‌र्ह सीट्स आहेत याची यादी संकेतस्थळावर दिलेली असते. त्यामुळे आपणाला ज्या महाविद्यालयात प्रवेश मिळूच शकणार नाही अशी महाविद्यालये सोडून, थोडेसे तारतम्य बाळगून प्राधान्यक्रम भरल्यास आपल्या आवडीच्या कॉलेजमध्ये सहज प्रवेश मिळू शकतो. या यादीत नंतर बदल करता येत नाही.

जाहिरात किंवा फाइन आर्ट या विषयात करिअर करण्यासाठी पदवीप्रमाणेच पदविका अभ्यासक्रमदेखील उपलब्ध आहेत.

कमीतकमी शिक्षण दहावी उत्तीर्ण सर्वसाधारणपणे उपलब्धतेनुसार जास्तीतजास्त मार्क मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना जी. डी. आर्ट पेंटिंग किंवा जी. डी. आर्ट अ‍ॅप्लाइड आर्ट या विभागात प्रवेश घेता येतो.

कला संचालनालय, महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत येणारे अभ्यासक्रम :

१)    सोफिया पॉलिटेक्निक (विद्या र्थिनींसाठी राखीव) फाउंडेशन, जी. डी. आर्ट कमर्शिअल, टेक्स्टाइल डिझाइन.

२)    रहेजा स्कूल ऑफ आर्ट, वांद्रे, फाऊंडेशन, जी. डी. आर्ट कमर्शिअल, जी.डी. आर्ट पेंटिंग.

३)    मॉडेल आर्ट इन्स्टिटय़ूट- दादर फाउंडेशन, ए. टी. डी.

४)    ठाणे स्कूल ऑफ आर्ट- ठाणे फाउंडेशन, इंटीरिअर डेकोरेशन, फाइन आर्ट

५)    वसई कला निकेतन- वसई फाउंडेशन, कमर्शिअल आर्ट, फाइन आर्ट

एका वर्षांच्या फाऊंडेशन कोर्सनंतरही चार वर्षांचा डिप्लोमा कोर्स करण्याची विद्यार्थ्यांला संधी मिळू शकते. वरील सर्व बाबींचा विचार करता असे लक्षात येईल की,

जर व्यवस्थित नियोजन व अभ्यास करून प्रयत्न

केल्यास बी.एफ.ए. पदवी कोर्सला अ‍ॅडमिशन घेण्यासाठीची प्रवेश परीक्षा देणे अगदी सोपे आहे. मग चित्रकलेत

करिअर करण्याच्या तयारीत असाल तर आताच अभ्यासाला लागा.

 प्रा. सुरेश राऊत

माजी प्राचार्य,

रचना संसद कॉलेज ऑफ अ‍ॅप्लाइड आर्ट, मुंबई.