|| सानिया भालेराव
saniya.bhalerao@gmail.com

जैवतंत्रज्ञान अर्थात बायोटेक्नॉलॉजी ही ज्ञानशाखा दिवसेंदिवस विस्तारत आहे, करोनोत्तर काळात तर ती अनेक विद्यार्थी पालकांसाठी कुतुहलाचा विषय झाली आहे. या क्षेत्रात करिअर कसे करावे, ते यशस्वी करण्याचे ज्ञानमार्ग कोणते, या साऱ्याचा आढावा ‘तंत्र जीवाचे’ या सदरातून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी घेण्यात येईल.
”The only thing that interferes with my learning is my education”

loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : श्रमिक ऊर्जा भांडवलाइतकीच महत्त्वाची
ajay kumar sood on country economic growth
स्वदेशी विज्ञान-तंत्रज्ञानाविना देशाचा विकास अशक्य!
Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप

अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे हे वाक्य माझे अत्यंत आवडते. आता तुम्ही म्हणाल की हे सदर जर मुळात शिक्षणाशी संबंधितच असेल तर चक्क शिक्षणावर अशी टिप्पणी करणारे वाक्य सुरुवातीलाच कशाला? तर काय आहे ना, मुळातच एखाद्या विषयात शिक्षण घेतले म्हणजे त्या विषयाचे ज्ञान आपल्याला मिळाले असे होत नाही. जीवशास्त्र (biological science), वैद्यकीय शास्त्र (medical science) हे विषय मुळातच प्रचंड विस्तृत आहेत. त्यांचा आवाका बराच मोठा आहे.
एक काळ होता जेव्हा बारावीमध्ये बायोलॉजी घ्यायचे की गणित अशा दोन पर्यायांचा विचार केला जायचा. ज्यांना इंजिनीअरिंग करायचे आहे ते विद्यार्थी बायोलॉजी हा विषय सोडून द्यायचे आणि ज्यांना वैद्यकीय क्षेत्रात जायचे आहे किं वा बायोलॉजीच्या क्षेत्रात रस आहे ते विद्यार्थी गणित हा विषय सोडून द्यायचे. पण आजच्या घडीला मूलभूत विषयांमधला असा एखादा विषय सोडून देणे हा पर्याय अजिबात योग्य नाही. कारण विज्ञानाच्या शाखांची फार सुरेख सरमिसळ आज वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पाहायला मिळते आणि म्हणूनच शिक्षणाकडे केवळ पदवी मिळवणे, या पलीकडे पाहण्याची खरी आवश्यकता आहे.

ज्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्रामध्ये रस आहे त्यांच्यासाठी आज बायोटेक्नॉलॉजी (जैवतंत्रज्ञान), बायोइन्फॉरमॅटिक्स पासून ते अगदी नॅनोटेक्नॉलॉजी पर्यंत वेगवेगळ्या प्रगत शाखा शिक्षणासाठी उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात करिअर करायचे आहे, धोपटमार्ग सोडून स्वत:चा असा वेगळा मार्ग शोधायचा आहे त्यांच्यासाठी तर अनेक वेगवेगळे विषय आज शिक्षणासाठी उपलब्ध आहेत. मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशनचे वारे गेल्या काही वर्षांत सगळीकडे वाहू लागले आहे. यामुळे वेगवेगळ्या विषयांची दारे सर्वच विद्यार्थ्यांसाठी खुली झालेली आहेत.

या सदरामध्ये आपण विज्ञान जगातल्या विशेषत: बायोलॉजिकल सायन्सेसशी संबंधित अशा निरनिराळ्या शाखांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्र हा विषय जवळचा वाटतो त्यांना १२वी नंतर कोणते विषय घेता येतील, करिअरसाठी कोणते नवनवीन मार्ग निवडता येतील, शिक्षणातील आणि कामातील साचेबद्धपणा थोडा मोकळा करून कशाप्रकारे नवीन कौशल्य आत्मसात करता येतील, हे आपण या सदराच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. बायोलॉजिकल सायन्सेसमध्ये संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सिस्टीम बायोलॉजी, इम्युनोइनफॉरमॅटिक्स, एपिजेनेटिक्स, कम्प्युटेशनल बायोलॉजी, न्यूरोबायोलॉजी, इम्युनोजेनेटिक्स, न्यूरोसायन्स, जेनेटिक इंजिनीअरिंग, बायोमेडिकल इंजिनीअरिंग, जिनोमिक्स, प्रोटिओमिक्स इत्यादी अशा अनेक विषयांमध्ये पुढे शिक्षण घेऊन स्वत:चा एक वेगळा आणि उत्तम पोर्टफोलिओ बनवता येऊ शकतो. इंटरडिसिप्लिनरी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच ही एक फार निराळ्या प्रकारची आणि वैशिष्टय़पूर्ण शाखा सध्या संशोधन क्षेत्रात उदयास येते आहे. जेव्हा एखाद्या विषयात संशोधन के ले जाते तेव्हा संशोधन प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. बायोलॉजिकल सायन्सेसमधले संशोधन हे कधीही फक्त एकाच विषयाशी निगडित नसते आणि अशा वेळी वैविध्यपूर्ण विषयांचे ज्ञान असणे ही एक जमेची बाजू ठरते . तसेच संशोधनाअंती हाती आलेले परिणाम मांडण्यासाठी देखील वेगवेगळ्या संगणकीय आणि सांख्यिकी साधनांची (computetional and statistical tools ) गरज असते आणि म्हणून संख्याशास्त्राचे ज्ञान असणेही महत्त्वाचे ठरते. म्हणूनच अगदी बारावीमध्ये जीवशास्त्रामध्ये रस असला तरीही गणित हा विषय बाजूला ठेवणे किंवा के वळ गुणांसाठी पाठांतर करून, घोकू न भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रासारख्या महत्त्वाच्या विषयांची नीट तयारी न करणे, याचा पुढील शिक्षणात फार त्रास होतो.

वेगळी वाट निवडायची असेल तर कष्ट करण्याची तयारी हवी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सर्व विषयांचा पाया पक्का हवा. बारावीपर्यंतचे शिक्षण हे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या अत्यंत महत्त्वाच्या चार विषयांचा पाया पक्का करणारे असते. त्यामुळे हे विषय नीट समजून-उमजून मूलभूत संकल्पना समजून आत्मसात के ले की, अर्धे काम झाले म्हणून समजा. इथून पुढे आपण जे काही शिकतो, त्यानुसार आपल्या करिअरच्या इमारतीचा एक एक मजला बांधला जातो. पाया पक्का असल्यावर इमारत आपोआपच टिकाऊ आणि इतरांपेक्षा वेगळी दिसते, पर्यायाने चमकते हे प्रत्येक विद्यार्थ्यांने लक्षात ठेवायला हवे.

बायोलॉजिकल सायन्सेस हा विषय करिअरच्या अनंत संधी उपलब्ध करून देणारा असला तरीही यामध्ये कष्ट, अभ्यास आणि मेहनत याला पर्याय नाही. इथून पुढे आपण या विश्वाची सफर करणार आहोत. एक एक विषय घेऊन त्यात नेमके काय असते, शिक्षणाच्या वाटा कशा असतील, संधी कोणत्या मिळू शकतात याविषयी माहिती करून घेणार आहोत.
तुमच्याही मनात या विषयाशी संबंधित काही प्रश्न असतील, शंका असतील तर नक्की कळवा. आपण या सदरातून त्या सगळ्या विषयांना स्पर्श करण्याचा प्रयत्न नक्की करू!

दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी भेटत राहू. ! नवीन विषय, नवीन संधी, नवीन पर्याय, नवीन वाटा एकत्र धुंडाळू !

(लेखिका बायोलॉजीकल सायन्सेसच्या अभ्यासक असून गेली १२ वर्षे या क्षेत्रात संशोधन-अध्यापनाचे काम करत आहेत.)