News Flash

करिअर मंत्र

बहुधा एखाद्या सिक्युरिटी एजन्सीमधील ती नोकरी असावी.

डॉ. श्रीराम गीत

मी कोल्हापूरला राहतो. बीए व डीएड पूर्ण करून राज्यशास्त्र विषयात एमए करीत आहे. सध्या इंडस्ट्रियल एरियात सुपरवायझरची नोकरी करतो आहे. सध्याच्या शिक्षण क्षेत्रातील नोकऱ्यांची स्थिती पाहता माझे दोन प्रश्न आहेत. बँकिंग क्षेत्रात सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून हाऊसिंग फायनान्समध्ये किती संधी आहेत? समजा, मी सोशल वर्कमधील पदवी घेतली तर त्यात काय करू शकेन

राजेंद्र राऊत

तुमच्या संपूर्ण शैक्षणिक वाटचालीवर नजर टाकली असता मला जाणवलेल्या बाबी प्रथम नोंदवत आहे. प्रथम बीएची पदवी घेतली. नंतर शिक्षक बनण्याच्या दृष्टीने डीएड केले. त्यातील एकूण फरपट लक्षात आली म्हणून नोकरी शोधताना इंडस्ट्रियल एरियात सुपरवायझरची नोकरी मिळाली. बहुधा एखाद्या सिक्युरिटी एजन्सीमधील ती नोकरी असावी. आता नव्याने पुन्हा काय शिकावे म्हणून राज्यशास्त्र हा विषय घेऊन एमएला सुरुवात केलीत. माझा साधा प्रश्न आहे तुम्हालाच? हाऊसिंग फायनान्समध्ये कर्ज कोणाला देतात, किती टक्के व्याजाने देतात, त्याचे मासिक हप्ते कसे आकारले जातात, किती वर्षांत ते फेडायचे असते? यातील साऱ्या प्रश्नांची उत्तरे तर तुम्हाला आता ज्ञात असतील तर तुमच्या स्वप्नातील हाऊसिंग फायनान्समध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरीचा विचार करावात. अन्यथा या रस्त्याचा तुम्हाला उपयोग होणे मला शक्य दिसत नाही. सहसा पदवी व नंतर एमबीए मार्केटिंग अशांचा यासाठी विचार होतो. कदाचित चुणचुणीत आणि वर दिलेल्या प्रत्येक प्रश्नाची सखोल माहिती असलेला निव्वळ पदवीधरसुद्धा निवडला जाऊ शकतो.

दुसरा प्रश्न म्हणजे सोशल वर्कमधील पदवी घेऊ काय? हातात असलेल्या तीन पदव्यांचा वापर न करता आल्याने वयाच्या पंचविसाव्या वर्षी (अंदाजे) आता नव्याने पुन्हा दोन वर्षे तुम्ही शिकणार. सध्याच एमएसडब्ल्यू झाल्यावर एक ते दोन वर्षे उमेदवारीमध्ये घालावी लागतात. त्या दरम्यान आपण मिळवत असलेला सुपरवायझर इतकाच पगार मिळत राहील हे प्रथम लक्षात घ्यावे. विविध स्वयंसेवी संस्थांत किमान तीन ते पाच वर्षे काम केल्यावरच या क्षेत्रात प्रगती होते. तोवर तुम्ही वाट पाहायला तयार आहात काय? अन्यथा सध्याची नोकरी चालू ठेवून एमए पूर्ण करावे. तसेच त्यानंतर नोकरी चालू ठेवून स्पर्धा परीक्षांद्वारे गट ‘ब’ वा ‘क’ साठी राज्य सेवा आयोगाच्या परीक्षांचा विचार करावा.

विद्यार्थी मित्र, मैत्रिणींनो, करिअर मंत्र या सदरासाठीचे आपले प्रश्न  career.mantra@expressindia.com येथे पाठवावेत. प्रश्नामध्ये आपली शैक्षणिक पात्रता जरूर नमूद करावी. त्यामुळे  उत्तरामध्ये अधिक स्पष्टता आणता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 12:59 am

Web Title: career guidance 52
Next Stories
1 इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पॅकेजिंगचा अभ्यासक्रम
2 प्राकृतिक भूगोल (मुलभूत अभ्यास)
3 सीसॅट सोप्या प्रश्नांचे विश्लेषण
Just Now!
X