News Flash

रोजगार संधी

राजस्थान राज्य विद्युत प्रसारण निगममध्ये ज्युनिअर केमिस्टच्या १९ जागा

| November 4, 2013 01:06 am

राजस्थान राज्य विद्युत प्रसारण निगममध्ये ज्युनिअर केमिस्टच्या १९ जागा 
अर्जदारांनी रसायनशास्त्रातील पदव्युत्तर पदवी अथवा केमिकल इंजिनीअरिंगमधील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३५ वर्षे.
यासंदर्भात अधिक माहितीसाठी राजस्थान राज्य विद्युत प्रसारण निगमच्या  www.rvuniv.com या संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ नोव्हेंबर २०१३.
न्यूक्लीअर पॉवर कॉपरेरेशन- कोटा येथे प्रशिक्षार्थीच्या १०६ जागा
अर्जदारांनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी अथवा त्यांच्याजवळ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पात्रता असायला हवी. अधिक माहिती व अर्जाच्या नमुन्यासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ ऑक्टोबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली न्यूक्लिअर पॉवर कॉपरेरेशनची जाहिरात पाहावी अथवा न्यूक्लिअर पॉवर कॉपरेरेशनच्या  www.npcil.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर करण्याची शेवटची तारीख १२ नोव्हेंबर २०१३.
‘एनएचपीसी’मध्ये प्रशिक्षार्थी इंजिनीअर्सच्या ३८ जागा
अर्जदारांनी सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, पर्यावरण अभियांत्रिकी यांसारख्या विषयातील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी एनएचपीसीच्या www.nhpcindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ नोव्हेंबर २०१३.
नौदलाचे पश्चिम मुख्यालय, मुंबई येथे फायरमनच्या २० जागा
अर्जदार शालांत परीक्षा उत्तीर्ण, शारीरिकदृष्टय़ा सक्षम आणि त्यांना जहाजावर काम करण्याचा तीन वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा ३५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १९ ते २५ ऑक्टोबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली नौदल मुख्यालय- मुंबईची जाहिरात पाहावी. संपूर्ण भरलेले, आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज दि फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ, नौदल मुख्यालय- पश्चिम क्षेत्र, शहीद भगतसिंह मार्ग, मुंबई -४००००१ या पत्त्यावर पाठविण्याची
शेवटची तारीख १२ नोव्हेंबर २०१३.
‘डीआरडीओ’ म्हणजेच डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमध्ये संशोधकांच्या तीन जागा
 उमेदवारांनी सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, कम्युनिकेशन वा मेटॅलर्जिकल इंजिनीअरिंगमधील पदवी कमीत कमी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण केलेली असावी. पदव्युत्तर पात्रताधारक व विदेशी भाषांचे ज्ञान असणाऱ्यांना प्राधान्य. वयोमर्यादा ३५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १९ ते २५ ऑक्टोबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली ‘डीआरडीओ’ची जाहिरात पाहावी अथवा  http:\ac.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर, रिक्रूटमेंट अँड असेसमेंट सेंटर (आरएसी) लखनऊ रोड, तियारपूर, दिल्ली- ११००५४ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १३ नोव्हेंबर २०१३.
संरक्षण मंत्रालयात वाहनचालकांच्या ७८ जागा
अर्जदार शालांत परीक्षा उत्तीर्ण व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत व त्यांच्याजवळ अवजड वाहन चालविण्याचा विहित परवाना असायला हवा. वयोमर्यादा २६ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १९ ते २५ ऑक्टोबरच्या अंकात प्रकाशित झालेली संरक्षण मंत्रालयाची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज कमांडिंग ऑफिसर, ५१२१ एसएससी-बीएन (एमटी) पिन ९०५१२१८/०५६ एपीओ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १४ नोव्हेंबर २०१३.
कृषी मंत्रालयांतर्गत संशोधन साहाय्यकांच्या पाच जागा उपलब्ध
अर्जदारांनी वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र वा कृषी-विज्ञान विषयातील पदवी उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे.  अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १९ ते २५ ऑक्टोबरच्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी निवड आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या www.sscnwr.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०१३.
चंदिगड पोलीस दलात शिपायांच्या ३४ जागा
अर्जदार १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा उत्तीर्ण व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २८ वर्षे. अर्जाच्या तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ ऑक्टोबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली चंदिगड पोलिसांची जाहिरात पाहावी अथवा www.chandigarhpolice.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०१३.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2013 1:06 am

Web Title: employment opportunities 5
टॅग : Employment,Job
Next Stories
1 देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या : नेदरलॅण्ड्समध्ये कायदा शाखेतील पदव्युत्तर शिष्यवृत्ती
2 जावे शोधांच्या गावा.. : इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टॉक्झिकॉलॉजी
3 लघुउद्योजकतेकडे वळताना..
Just Now!
X