उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत व त्यांनी मराठी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनीट तर इंग्रजी टंकलेखनाची ४० शब्द प्रतिमिनीट पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३३ वर्षे.
यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ, पुणेच्या http://oasis.mkcl.org.jdr या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ डिसेंबर २०१३.

भारत सरकार टांकसाळ, कोलकाता येथे ज्युनिअर डाटा एन्ट्री ऑपरेटरच्या १८ जागा :
अर्जदारांनी पदवी परीक्षा कमीत कमी ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व इंग्रजी टंकलेखनाची ४० शब्द प्रतिमिनीट पात्रता पूर्ण केलेली असावी. संगणकाचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा २८ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या ३० नोव्हेंबर-६ डिसेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली भारत सरकार- टांकसाळ कोलकाताची जाहिरात पाहावी अथवा http://www.jobapply.in/igmkolkatta या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ डिसेंबर २०१३.
भारत हेवी इलेक्ट्रिक्समध्ये पदविका इंजिनीअर्ससाठी ३८ जागा :
उमेदवार सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स वा मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदविकाधारक असावेत व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा. वयोमर्यादा ३३ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या ३० नोव्हेंबर-४ डिसेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली भारत हेवी इलेक्ट्रिक्सची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज डेप्युटी जनरल मॅनेजर (एचआर), भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, इलेक्ट्रॉनिक्स डिव्हिजन, पोस्ट बॉक्स नं. २६०६, म्हैसूर रोड, बंगळुरू-५६००२६ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २८ डिसेंबर २०१३.
‘इस्रो’मध्ये टेक्निशियन्सच्या ७२ जागा :
उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रमेन्ट मेकॅनिक, मशिनिस्ट, टर्नर, इलेक्ट्रोप्लेटर, केमिकल प्लान्ट अटेन्डन्ट ऑपरेटर यांसारख्या विषयांतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या ३० नोव्हेंबर-३ डिसेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली ‘इस्रो’ची जाहिरात पाहावी अथवा ‘इस्रो’च्या http://www.sac.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (आरएमटी अॅण्ड रेव्ह), बिल्डिंग नं. ३०-डी, स्पेस अॅप्लिकेशन सेंटर (इस्रो), अंबावाडी विस्तार पोस्ट ऑफिस, जोधपूर टेकरा, अहमदाबाद-३८००१५ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१३.
नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी-मुंबई येथे स्टेनोग्राफर्सच्या ३ जागा :
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत व त्यांना संगणकीय पद्धतीसह काम करण्याचा तीन वर्षांचा अनुभव असायला हवा.
अर्जाचा नमुना, अधिक माहिती व तपशिलासाठी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या http://www.nia.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि तपशिलासह असणारे अर्ज डीआयजी, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, ७ वा माळा, कंबाला हिल एक्स्चेंज बिल्डिंग, पेडर रोड, मुंबई-४०००२६ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१३.