उमेदवारांनी टेक्स्टाइल टेक्नॉलॉजीमधील पदवी अथवा पदविका उत्तीर्ण केलेली असावी. त्यांना संबंधित कामाचा दोन वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा २५ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०१५ च्या अंकातील टेक्स्टाइल कमिटीची जाहिरात पाहावी अथवा http://www.textilescommittee.ic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज सेक्रेटरी, टेक्स्टाइल कमिटी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, प्रभादेवी चौक, प्रभादेवी, मुंबई- ४०००२५ या पत्त्यावर १९ सप्टेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, दिल्ली येथे कनिष्ठ संशोधकांच्या ३ जागा
उमेदवारांनी मानसशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तम शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. ते ‘नेट’ पात्रताधारक असावे. वयोमर्यादा २८ वर्षे. अधिक माहितीसाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०१५ च्या अंकातील ‘डीआरडीओ’ची जाहिरात पाहावी. अर्ज डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, रिक्रूटमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅसेसमेंट सेंटर, लखनऊ रोड, तिमारपूर, दिल्ली ११००५४ या पत्त्यावर १९ सप्टेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

दक्षिण रेल्वेमध्ये खेळाडूंसाठी ४६ जागा
उमेदवार शालांत परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असावेत किंवा त्यांनी इंग्रजी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट व हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट पात्रता पूर्ण केलेली असावी. उमेदवारांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेले असावे. वयोमर्यादा २५ वर्षे. तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २२ ते २८ ऑगस्ट २०१५ च्या अंकातील दक्षिण रेल्वेची जाहिरात पाहावी. अर्ज असिस्टंट पर्सोनेल ऑफिसर-रिक्रूटमेंट, रेल्वे रिक्रूटमेंट सेल, सदर्न रेल्वे, तिसरा मजला, डॉ. पी. व्ही. चेरियन क्रिसेंट रोड, इग्मोर, चेन्नई- ६००००८ या पत्त्यावर २१ सप्टेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

अणुऊर्जा केंद्र- बांधकाम विभाग, मुंबईत सायंटिफिक असिस्टंटच्या ९ जागा
उमेदवारांनी सिव्हिल इंजिनीअिरगमधील पदविका किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २२ ते २८ ऑगस्ट २०१५ च्या अंकातील अणुऊर्जा केंद्राच्या बांधकाम विभागाची जाहिरात पाहावी.
अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह असिस्टंट पर्सोनेल ऑफिसर (रिकट्रमेंट), डायरेक्टोरेट ऑफ कन्स्ट्रक्शन सव्‍‌र्हिसेस अ‍ॅण्ड इस्टेट मॅनेजमेंट, डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जी, विक्रम साराभाई भवन, दुसरा मजला, नॉर्थ विंग, अणुशक्तीनगर, मुंबई- ४०००९४ या पत्त्यावर २१ सप्टेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

एमटेक – पॉवर सिस्टीम उमेदवारांसाठी ३५ जागा
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची संधी असून उमेदवार पॉवर सिस्टीममधील एमटेक पदवी किमान ६५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असावेत. त्यांचा शैक्षणिक आलेख उत्तम असावा. वयोमर्यादा २८ वर्षे.
अधिक माहितीसाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १५ ते २१ ऑगस्ट २०१५ च्या अंकातील पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनची जाहिरात पाहावी अथवा कॉर्पोरेशनच्या http://www.powergridindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १६ सप्टेंबर २०१५ पर्यंत अर्ज करावा.

दक्षिण-पूर्व रेल्वेमध्ये स्काऊट व गाइड्ससाठी ८ जागा
अर्जदार बारावी उत्तीर्ण असावेत. त्यांनी इंग्रजी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट व हिंदी टंकलेखनाची २५ शब्द प्रतिमिनिट पात्रता उत्तीर्ण केलेली असावी किंवा ते औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असावेत. वयोगट ३९ ते ४२ वर्षे.
अर्जाच्या तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ८ ते १४ ऑगस्ट २०१५ च्या अंकातील दक्षिण-पूर्व रेल्वेची जाहिरात पाहावी. अर्ज असिस्टंट पर्सोनेल ऑफिसर (रिक्रूटमेंट), रेल्वे रिक्रूटमेंट सेल, आरटीएस कॉलनी, केंद्रीय विद्यालयाजवळ, एसईसी रेल्वे, बिलासपूर (छत्तीसगढ) ४९५००४ या पत्त्यावर १८ सप्टेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.