केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या नागपूर येथील नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूटच्या थर्मल प्लँट इंजिनीअरिंग या अभ्यासक्रमाच्या २०१५-१६ या सत्राची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
उमेदवारांनी मेकॅनिकल इलेक्ट्रिक, इलेक्ट्रिकल- इलेक्ट्रॉनिक्स या विषयातील पदविका परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
निवड प्रक्रिया
वर नमूद केलेल्या पात्रता परीक्षेत अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांकाच्या आधारे त्यांची अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात येईल आणि त्यांना अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यात येईल.
उपलब्ध जागा
अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागांची संख्या ६५ असून यापैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत.
अर्जासह पाठवायचे शुल्क
प्रवेश अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून एक हजार रुपयांचा एनपीटीआय (पश्चिम विभाग), नागपूर यांच्या नावे असणारा आणि नागपूर येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट पाठवणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याची मुदत
विहित नमुन्यातील व आवश्यक तो तपशील असणारे प्रवेश अर्ज प्रिन्सिपल डायरेक्टर, नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, दक्षिण अंबाझरी मार्ग, व्हीएनआयटीसमोर, गोपाळनगर, नागपूर- ४४००२२ या पत्त्यावर १९ ऑक्टोबर २०१५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
अधिक माहिती
अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहितीसाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १९ ते २५ सप्टेंबर २०१५च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, नागपूरची जाहिरात वाचावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.nptinagpur.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.