विद्यापीठ विश्व : प्रथमेश आडविलकर

विद्यापीठाची ओळख – चीनमधील शांघायमध्ये स्थित असलेले फुदान विद्यापीठ हे त्या देशामधील एक प्रमुख शासकीय संशोधन विद्यापीठ आहे. सर्वाधिक विद्यार्थ्यांकडून निवडले जाणारे हे चीनमधील प्रतिष्ठित विद्यापीठ आहे. फुदान विद्यापीठाचा क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सटिी रँकिंगनुसार जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत चव्वेचाळीसवा क्रमांक आहे. या विद्यापीठाची स्थापना १९०५ साली ‘फुदान पब्लिक स्कूल’ या महाविद्यालयाच्या माध्यमातून झाली. कालांतराने हे महाविद्यालय खासगी विद्यापीठ बनले आणि १९७० साली चीनमधील सांस्कृतिक क्रांतीनंतर त्याला राष्ट्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. फुदान विद्यापीठ हे आशिया खंडातील सहाव्या, तर चीनमधील तिसऱ्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. फुदान विद्यापीठ हे चिनी सरकारच्या ‘सी-९ लीग’चा एक महत्त्वाचा सदस्य असून चिनी शिक्षण मंत्रालयाच्या ‘डबल फर्स्ट क्लास युनिव्हर्सटिी’ योजनेनुसार ‘अ-दर्जाचे’ विद्यापीठ आहे. फुदान विद्यापीठ एकूण सहाशे एकरच्या क्षेत्रफळामध्ये व्यापलेले आहे. फुदानचा मध्यवर्ती कॅम्पस हा शांघायमध्ये असून हन्दन, फेन्गलीन, झांगीजियांग, जिंग्वान या चार ठिकाणी इतर स्वतंत्र कॅम्पस आहेत. या विद्यापीठामध्ये सध्या जवळपास तीन हजार प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून जवळपास बत्तीस हजारांहून अधिक पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत. दरवर्षी साधारणपणे दोन हजार आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वेगवेगळ्या देशांमधून येथे आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी येतात.

अभ्यासक्रम – फुदान विद्यापीठातील पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचे असून पदव्युत्तर अभ्यासक्रम वेगवेगळ्या कालावधींचे आहेत. हे सर्व अभ्यासक्रम चिनी आणि इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहेत. विद्यापीठामध्ये एकूण सतरा पूर्णवेळ स्कूल्स, ६९ शैक्षणिक-संशोधन विभाग, पदवी अभ्यासक्रम बहाल करणारे ७३ विभाग, बावीस प्रमुख विद्याशाखा, या विद्याशाखांचे १३४ साहाय्यक विभाग (हे साहाय्यक विभाग जरी असले तरी त्यांना पीएचडी पदवी बहाल करावयाचे अधिकार आहेत), पदव्युत्तर अभ्यासक्रम बहाल करणारे २०१ विभाग, व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांची देखरेख करणारे सहा विभाग, समाजशास्त्र विषयांतील राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेली सात संशोधन केंद्रे, मूलभूत विज्ञानात कार्यरत नऊ संशोधन व प्रशिक्षण केंद्रे आणि २५ पोस्ट-डॉक्टरल रिसर्च स्टेशन्स इत्यादी घटक वेगवेगळ्या पातळ्यांवर सूत्रबद्धरीत्या कार्यरत आहेत. विद्यापीठामध्ये शिकविल्या जाणाऱ्या विषयांमध्ये मेडिसिन, विज्ञान, औषध आणि दंतचिकित्सा, आरेखन आणि पर्यावरण, कायदा, कला आणि सामाजिक विज्ञान, व्यवसाय, संगणन आणि संगीत, फाइन आर्ट्स, फॉरेस्ट्री, बायोइंजिनीअिरग, केमिकल इंजिनीअिरग, सिव्हिल अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअिरग, मॅनेजमेंट, इलेक्ट्रिकल इंजिनीअिरग, कॉम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल इंजिनीअिरग, अँथ्रॅपॉलॉजी, इकॉनॉमिक्स, हिस्टरी, लिंग्विस्टिक्स, फिलॉसॉफी, पॉलिटिकल सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथेमॅटिक्स, म्युझिक, डान्स, इंग्लिश, सायकोलॉजी, नìसग इत्यादींचा समावेश आहे. फुदान विद्यापीठामध्ये संशोधनाला प्राधान्य दिले जाते. विद्यापीठामार्फत चालणाऱ्या या सर्व अभ्यासक्रमांना विद्यापीठाने विविध आंतरराष्ट्रीय विद्यापीठ वा संशोधन संस्थांबरोबर जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यापीठातील ऑफलाइन अभ्यासक्रम हे फॉल आणि स्प्रिंग या दोन सत्रांमध्ये चालतात, तर ऑनलाइन अभ्यासक्रम वर्षभर उपलब्ध असतात. विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी त्या-त्या पदवी वा पदव्युत्तर स्तरासाठी आवश्यक असलेली आंतरराष्ट्रीय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.

सुविधा – फुदान विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येच ‘इंटरनॅशनल स्टुडंट्स डॉर्मिटरी’ या इंटरनेटसहित इतर सर्व अद्ययावत सुविधांनी सज्ज असलेल्या ‘इ-हॉल्स’ म्हणजेच इ-वसतिगृहाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाशिवाय इतरत्रसुद्धा राहू शकतात, मात्र अशा विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाकडून कोणतीही अधिकृतरीत्या मदत करणारी व्यवस्था नाही. शहराच्या इतर भागांतून विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बसची सोयही करण्यात आलेली आहे. विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चिनी शासनाच्या शिष्यवृत्ती व पाठय़वृत्तीच्या माध्यमातून आíथक साहाय्य उपलब्ध करून दिले जाते. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासाठी असलेली अर्जप्रक्रिया व इतर बाबींबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. विद्यापीठाचे ग्रंथालय आणि सर्व प्रयोगशाळा अद्ययावत आहेत. विद्यापीठाचा कॅम्पस सुरक्षित असून विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय गरजांसाठी विद्यापीठाच्या आवारातच मोफत वैद्यकीय केंद्रे उपलब्ध आहेत.

वैशिष्टय़

चीनमधील विविध क्षेत्रांतील अग्रणी नेतृत्व हे फुदान विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. विद्यापीठाचे प्राध्यापक त्यांच्या अध्यापन- संशोधनासाठी जागतिक पातळीवर नावाजले गेले आहेत. फुदान विद्यापीठ अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर संलग्न आहे. विद्यापीठ ‘द कन्सोर्टयिम ऑफ अ‍ॅकॅडमिक स्टिव्हर्डस फॉर द स्कॉलरशिप’ या संस्थेचे सदस्य आहे. तसेच विद्यापीठ ‘चायना सेंटर ऑस्ट्रिया’चे सदस्य आणि ऑस्ट्रियन बिझिनेस स्कूल एसएमबीएसचे भागीदार आहे. याशिवाय फुदान विद्यापीठ ‘युनिव्हर्सटिास २१’ या जगभरातील अग्रगण्य विद्यापीठांच्या संस्थेचे सदस्य आहे. या माध्यमातून विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना परदेशात संशोधन करण्याच्या अनेक संधी मिळतात.

संकेतस्थळ -https://www.fudan.edu.cn/en/

itsprathamesh@gmail.com