News Flash

गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा : सामान्य विज्ञानाचे घटक

सामान्य विज्ञान घटकाचा अभ्यासक्रम

|| फारुक नाईकवाडे

मागील लेखामध्ये सामान्य विज्ञान या घटकावर पहिल्या गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण आणि त्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये या घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे. गट क सेवेसाठी दहावी म्हणजेच शालान्त परीक्षेची काठीण्य पातळी विहित करण्यात आली आहे. विहित अभ्यासक्रम, प्रश्नांचे विश्लेषण आणि अभ्यासक्रम यांचा एकत्रित विचार करून तयारीबाबतची चर्चा या लेखामध्ये करण्यात येत आहे.

सामान्य विज्ञान घटकाचा अभ्यासक्रम

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र व आरोग्यशास्त्र या अभ्यासक्रमामध्ये स्पष्टपणे नमूद न केलेला पण स्वतंत्रपणे विचारण्यात येणारा एक घटक आहे, मानवी शरीर रचनाशास्त्र. गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेचे उपलब्ध असल्याने काही प्रमाणात अभ्यासाला दिशा देण्यासाठी त्या विश्लेषणाचा नक्कीच उपयोग होणार हे दुसरे वर्ष आहे. तयारीसाठी असणारा पहिल्या वर्षीचा संभ्रम आता दूर झालेला आहेच शिवाय मागच्या वर्षीची प्रश्नपत्रिका विश्लेषणासाठी आहे.

 • आरोग्य, रोग व त्यांचे उपचार, वनस्पतींचे वर्गीकरण व त्या त्या वर्गाची वैशिष्टय़े यांवर सर्वाधिक प्रश्न विचारण्यात आले आहेत. तर रसायनशास्त्रावर केवळ दोनच प्रश्न. तरीही तयारी कोणत्याही एका उपघटकास इतर उपघटकांपेक्षा कमी किंवा जास्त महत्त्व देणे योग्य ठरणार नाही.

जीवशास्त्र हा घटक भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र यांपेक्षा जास्त गुणांसाठीच विचारण्यात येईल असे गृहीत धरता येईल. मात्र एकूणच विज्ञानाच्या प्रश्नांची काठीण्य पातळी पाहता सर्वच उपघटकांची तयारी करून सगळे १५ गुण मिळवता येणे शक्य आहे. त्यामुळे सर्वच घटक गांभीर्याने तयार करणे जास्त व्यवहार्य आहे.

 • बहुविधानी प्रश्न हे पारंपरिक मुद्दय़ांवर बेतलेले आहेत त्यामुळे त्यांचीही तयारी मूलभूत अभ्यासाच्या जोरावर पूर्ण होऊ शकते.

वरील विश्लेषणाच्या आधारे या घटकाची पुढीलप्रमाणे तयारी करता येईल :

 • विविध शास्त्रज्ञांनी मांडलेले महत्त्वाचे सिद्धांत, द्रव्य, त्यांचे स्वरूप व त्यांच्या अवस्था, मूलद्रव्ये आणि त्यांची वैशिष्टय़े, धातू, अधातू आणि त्यांची वैशिष्टय़े, आधुनिक आवर्तसारणी व तिची ठळक वैशिष्टय़े, काही महत्त्वाच्या मूलद्रव्यांच्या संज्ञा, महत्त्वाची संयुगे आणि त्यांची रासायनिक सूत्रे, आम्ल, आम्लारी व क्षार तसेच त्यांच्यामधील प्राथमिक अभिक्रिया, कार्बनी व अकार्बनी संयुगे आणि त्यांची रासायनिक सूत्रे हा रसायनशास्त्र घटकाचा अभ्यासक्रम गृहीत धरावा.
 • रसायनशास्त्र घटकाचा अभ्यास वस्तुनिष्ठ पद्धतीने टेबलमध्ये नोट्स काढून करता येतो. त्यासाठी वरील अभ्यासक्रम समजून घेऊन त्यावरील मागचे प्रश्न पाहून सराव करणे हा महत्त्वाचा भाग आहे.
 • प्रकाश, ध्वनी, िभग, धाराविद्युत, चुंबकत्व, गती व गतीविषयक समीकरणे यांवर मूलभूत संकल्पना आणि गणिते विचारली जाऊ शकतात. गणितांच्या सरावासाठी पाठय़पुस्तकामधील उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा.
 • वर्गीकरणाच्या पद्धती व संबंधित शास्त्रज्ञ, विविध संच व विभाग व त्यातील प्राणी/वनस्पती व त्यांची वैशिष्टय़े, हा अभ्यास टेबलमध्ये वस्तुनिष्ठ पद्धतीने करावा.
 • अवयवसंस्थांमधील वस्तुनिष्ठ बाबींवर लक्ष द्यावे. अवयवांची काय्रे, रचना, संरक्षक बाबी, वैशिष्टय़े, ग्रंथींचे स्थान, त्या स्रवतात ती विकरे, संप्रेरके, त्याच्याशी संबंधित आजार व त्यावरील उपचार या बाबींचा टेबलमध्ये अभ्यास करता येईल.
 • रोगांचे प्रकार- जिवाणूजन्य, विषाणूजन्य, कवकजन्य, आदिजीवजन्य, संसर्गजन्य, असंसर्गजन्य, लंगिकदृष्टय़ा पारेषित होणारे, आनुवंशिक आजार समजून घ्यावेत. या सर्व रोगांचा त्यांची लक्षणे, कारणीभूत घटक, प्रसार, बाधित होणारे अवयव, उपचारपद्धती अशा मुद्दय़ांच्या अनुषंगाने अभ्यास करावा. यासाठीही टेबल तयार करता येईल.
 • राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर एखादा रोग जास्त चच्रेमध्ये असेल तर त्याचे स्थान, प्रसार, उपचारांसाठी केले जात असणारे प्रयत्न इ. चालू घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. या घटकावर विचारले जाणारे प्रश्न थेट, वस्तुनिष्ठ, चालू घडामोडींवर आधारित असतात. म्हणून या तिन्ही बाबींकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.
 • आरोग्याबाबतच्या केंद्र व राज्य शासनाच्या योजना व त्यांची उद्दिष्टे माहीत असायला हवीत.
 • विज्ञानाशी संबंधित कृषीविषयक काही घटकांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे लक्षात ठेवायला हवे. वनस्पतींमधील खनिजांच्या कमतरतेमुळे होणारे रोग, महत्त्वाची पिके व त्यांवरील रोग व त्यावरील उपाय, तणनाशके, बुरशीनाशके, कीटकनाशके यांचा आरोग्यावरील परिणाम या बाबींच्या नोट्स टेबलमध्ये काढता येतील.
 • सर्व शाखांमधील शोध, सिद्धांत व वैज्ञानिक यांची नोट तयार करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2019 8:46 am

Web Title: general science complete study material
Next Stories
1 करिअर मंत्र
2 नोकरीची संधी
3 एमपीएससी मंत्र : सामान्य विज्ञान विषयाची तयारी
Just Now!
X