ध्येयनिश्चिती आणि ध्येयप्राप्ती करण्यासाठी योजना तयार करण्याची तुमची क्षमता हे तुम्हाला यश मिळवण्यासाठी आवश्यक ठरणारे कौशल्य आहे.
एकाच वेळी एकाहून अधिक कामे करण्याची तुमची क्षमता यशासाठी आवश्यक ठरते. यश संपादन करण्यासाठी एका विशिष्ट पद्धतीने टप्पे पार
पाडावे लागतात.
स्वयंपाकघरात एखादा पदार्थ तयार करण्यासारखी कृती हेदेखील एकाच वेळी अनेक गोष्टी हाताळाव्या लागणारे काम असते. बहुविध कामांची योजना तयार करण्याच्या आणि ती पूर्ण करण्याच्या कौशल्यावर प्रभुत्व मिळविण्यासाठी तुमची क्षमता तुम्हाला इतर व्यक्तींहून अधिक काही साध्य करण्यासाठी सक्षम बनवते. म्हणून कामे पार करण्याची योजना तुमच्या यशासाठी महत्त्वाची आहे.
योजना आखल्याने तुमचे प्रमुख उद्दिष्ट हे नियोजित बहुविधकामांच्या प्रकल्पात रूपांतरित करणे शक्य होते. या प्रकल्पात नेमक्या टप्प्यांचा प्रारंभ, मध्य आणि अंत निश्चित असावा. प्रत्येक टप्प्याची आणि एकूण प्रकल्पाची कालमर्यादा सुस्पष्ट असावी. सुदैवाने, हे शिकता येण्याजोगे आणि सरावाने प्रभुत्व मिळण्याजोगे कौशल्य आहे. हे कौशल्य तुम्हाला तुमचा व्यवसाय आणि संस्थेतील सर्वाधिक परिणामकारक आणि प्रभावशाली लोकांपैकी एक बनवेल. तुम्ही जितका सराव कराल तितके तुम्ही त्यात निष्णात बनाल. त्यासाठी..
 तुम्हाला नेमके काय हवे आणि का हवे आहे, याची संपूर्ण कल्पना तुम्हाला असू द्या.
तुम्ही तुमची ध्येये लिहून काढा. ती प्राधान्यक्रमानुसार असू द्या. त्यात तुमचा प्रमुख, निश्चित हेतू निवडा.
गोल्स – ब्रायन ट्रेसी, अनुवाद – गीतांजली गीते, साकेत प्रकाशन, पृष्ठे – २५६, मूल्य – २२५ रु.