navi-kshitijeभूकरमापक, लिपिक-टंकलेखकांच्या १३० जागा 
महाराष्ट्र शासन- उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे अंतर्गत भूकरमापक, लिपिक-टंकलेखकांच्या १३० जागा उपलब्ध आहेत. अर्जदारांनी सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदविका उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सव्र्हेअरविषयक पात्रताधारक असावेत.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ, पुणेच्या http://oasis mkcl.org/laudreconds 2014 या संकेतस्थळाला भेट द्यावी.या पदांकरता ९ डिसेंबर २०१४ पर्यंत संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करावेत.

दक्षिण-पूर्व रेल्वेमध्ये स्काउट गाईडस्साठी १० जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असावेत. त्यांनी स्काउट आणि गाईडस्मध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेली असावी.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १५ ते २१ नोव्हेंबर २०१४ च्या अंकातील दक्षिण-पूर्व रेल्वेची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज कागदपत्रांसह असिस्टंट पसरेनेल ऑफिसर (रिक्रुटमेंट), साऊथ ईस्टर्न रेल्वे, ११, गार्डन रिच रोड, कोलकोता ७०००४३ या पत्त्यावर १५ डिसेंबर २०१४ पर्यंत पाठवावेत.

‘गेल’ इंडियामध्ये फायरमनच्या १० जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. त्यांनी अग्निशमनविषयक प्रशिक्षण घेतलेले असावे.
वयोमर्यादा २५ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १५ ते २१ नोव्हेंबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली ‘गेल’ची जाहिरात पाहावी अथवा कंपनीच्या http://www.gailonline.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज सीनिअर मॅनेजर (एचआर), गेल इंडिया लि. जीआयडीसी इंडस्ट्रियल इस्टेट, वाघोडिया, जि. वडोदरा (गुजरात) ३९१७६० या पत्त्यावर १५ डिसेंबर २०१४ पर्यंत पाठवावेत.

पश्चिम रेल्वेमध्ये स्काउट व गाईडस्साठी १२ जागा
उमेदवारांनी शालान्त परीक्षा कमीत कमी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्याशिवाय स्काउट आणि गाईडस्मध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १५ ते २१ नोव्हेंबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली प. रेल्वेची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज असिस्टंट पसरेनेल ऑफिसर (पी अॅण्ड टी), पश्चिम रेल्वे मुख्यालय ओल्ड बिल्डिंग, चर्चगेट, मुंबई ४०००२०. या पत्त्यावर १५ डिसेंबर २०१४ पर्यंत पाठवावेत.

इंडो-तिबेटन सीमा पोलीस दलात पशुवैद्यक साहाय्यकांच्या जागा
उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ८ ते १४ नोव्हेंबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली इंडो तिबेटन सीमा पोलिसांची जाहिरात पाहावी अथवा आयटीबीपीच्या http://www.itbpolice.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज दि इन्स्पेक्टर जनरल (नॉर्थ ईस्ट), फ्रंटियर हेडक्वार्टर्स, ओल्ड एपी सेक्रेटरीएट बिल्डिंग, कँट एरिया, जीएस रोड, शिलाँग (मेघालय) ७९३००१ या पत्त्यावर पाठविण्याची १५ डिसेंबर २०१४ पूर्वी पाठवावेत.

कोकण रेल्वे कॉपरेरेशनमध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी ५० जागा
कोकण रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी ५० जागा राखून ठेवण्यात आल्या आहेत. या संदर्भात अधिक माहितीसाठी विविध वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेली कोकण रेल्वेची जाहिरात पाहावी अथवा कोकण रेल्वेच्या http://www.konkanrailway.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज कोकण रेल्वे कॉपरेरेशन लिमिटेड, बेलापूर भवन, सेक्टर- ११, सीबीडी- नवी मुंबई या पत्त्यावर ९ डिसेंबर २०१४ पर्यंत पाठवावेत.