भारत सरकार, डिपार्टमेंट ऑफ स्पेस, लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटर, वलियमला, तिरूवनंतपुरम् (जाहिरात क्र. 2/9(6) 2019/Rectt/RMT) इंजिनिअरींग ग्रॅज्युएट्स आणि लायब्ररी सायन्स ग्रॅज्युएट्सना अ‍ॅप्रेंटिसशिपसाठी सेंट्रलाईज्ड् सिलेक्शन पद्धतीने प्रवेश.

(एकूण प्रवेश ७३)
१) मेकॅनिकल – ४०
२) इलेक्ट्रिकल – सात
३) इलेक्ट्रॉनिक्स – आठ
४) रासायनिक – एक
५) कॉम्प्युटर सायन्स – पाच
६) सिव्हील – चार
७) इन्स्ट्रमेंटेशन – दोन
८) लायब्ररी सायन्स – सहा

पात्रता

पद क्रमांक एक ते सात साठी संबंधित विषयातील प्रथम श्रेणीत किमान ६५ टक्के गुणांसह इंजिनिअरींग पदवी उत्तीर्ण (6.84 CGPA)
पद क्र. ८ साठी पदवी + लायब्ररी सायन्समधील प्रथम वर्गातील पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

एप्रिल २०१७ किंवा त्यानंतर पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. अ‍ॅप्रेंटिसशिपचा कालावधी एक वर्षांचा असणार आहे. प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना नियमानुसार दरमहा स्टायपेंड दिले जाईल.

बोर्ड ऑफ अ‍ॅप्रेंटिसशिप ट्रेनिंगच्या सदर्न रिजनमध्ये येणाऱ्या राज्यांतील (केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पाँडिचेरी) विद्यापीठांतून पात्रता परीक्षा उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. जर जागा शिल्लक राहिल्या तर इतर विद्यापीतील उमेदवारांचा विचार केला जाईल.

वयोमर्यादा – दि. २२ डिसेंबर २०१९ रोजी ३५ वर्षपर्यंत. (इमाव – ३८ वर्षपर्यंत, अजा/अज – ४० वर्षपर्यंत, विकलांग – ४५ वर्षपर्यंत)

प्रशिक्षण कालावधी दरम्यान उमेदवारांना लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटरकडून राहण्याची व्यवस्था केली जाणार नाही.

निवड पद्धती –
पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवारांची अॅप्रेंटिसशिपसाठी निवड करण्यात येईल.

अर्ज कसा करावा –
इच्छुक उमेदवारांनी दि. २२ डिसेंबर २०१९ रोजी (रविवार) लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटर पॅव्हेलियन, सेंट मेरिज हायर सेकंडरी स्कूल, पट्टम, तिरूवनंतपुरम येथे पुढील प्रमाणपत्रांच्या ओरिजिनल्स आणि स्वयंसाक्षांकीत प्रतींसह उपस्थित रहावयाचे आहे.
१) पदवी प्रमाणपत्र
२) पदवी कन्सॉलिडेटेड मार्कलिस्ट
३) जन्मतारखेचा पुरावा (10 वीचे प्रमाणपत्र)
४) अनुभवाचा दाखला
५) जातीचा दाखला (अजा/अजसाठी) ,
६) नॉन-क्रिमी लेयर दाखला (इमावसाठी)
७) इन्कम अँड असेट सर्टिफिकेट (ईडब्ल्यूएस्साठी)
८) विकलांगता दाखला
९)एक पासपोर्ट आकाराचा फोटो आणि बायोडेटा.