सीएसआयआर म्हणजेच कौन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेत सीनिअर रिसर्च फेलोशिप व रिसर्च असोसिएटशिपअंतर्गत उपलब्ध असणाऱ्या संशोधनपर संधींसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

सीनिअर रिसर्च फेलोशिप
उमेदवारांनी बीई- बी.टेक्, एम.एस्सी. यांसारखी पात्रता किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यानंतर संबंधित विषयातील संशोधनपर पीएच.डी. पूर्ण केलेली असावी अथवा एमई- एम.टेक् पात्रता किमान ६० टक्के गुणांसह पूर्ण केलेली असावी. त्यांना संबंधित कामाचा दोन वर्षांचा अनुभव असावा अथवा त्यांनी एमबीबीएस- बीडीएस यांसारखी अर्हता किमान ६० टक्के गुणांसह प्राप्त केलेली असावी. त्याशिवाय संबंधित क्षेत्रातील उमेदवारी पूर्ण केलेली असावी अथवा बीफार्म, बीव्हीएस्सी, बीएस्सी (कृषी) यांसारखी अर्हता किमान ५५ टक्क्य़ांसह पूर्ण करून त्यानंतर संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी व संशोधनपर पीएच.डी. पूर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा- उमेदवारांचे वय
३२ वर्षांहून अधिक नसावे.

रिसर्च असोसिएटशिप
अर्जदारांनी विज्ञान अथवा अभियांत्रिकी विषयात संशोधनपर पीएच.डी. मिळवलेली असावी अथवा याच विषयातील एमडी- एमएस- एमडीएस अर्हता प्राप्त केलेली असावी. त्यांना संबंधित क्षेत्रातील संशोधनपर कामाचा सुमारे दोन वर्षांचा
अनुभव असावा.
ज्या अर्जदारांनी आपल्या पीएच.डी. पात्रतेसाठी संशोधनपर प्रबंध सादर केला असेल तेसुद्धा या योजनेअंतर्गत अर्ज करण्यास
पात्र आहेत.
वयोमर्यादा- अर्जदारांचे वय
३५ वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी शिथिलक्षम आहे.

पाठय़वेतनाचा तपशील
योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना खाली नमूद केल्याप्रमाणे पाठय़वेतन देण्यात येईल.
* सीनिअर रिसर्च फेलोशिप- संशोधनपर पीएच.डी. अथवा दोन वर्षे कालावधीसाठी दरमहा २८ हजार रु. पाठय़वेतन देण्यात येईल.
* रिसर्च असोसिएट्स- संशोधन कालावधीदरम्यान दरमहा ३६ हजार रु. ते ४० हजार रुपये पाठय़वेतन देण्यात येईल.
वरील पाठय़वेतनाशिवाय उमेदवारांना दर वर्षी वार्षिक आकस्मिक खर्चापोटी २० हजार रुपये देण्यात येतील.

अधिक माहिती
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १४ ते २० नोव्हेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली कौन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रिलेशन्सची जाहिरात पाहावी अथवा ‘सीएसआयआर’च्या http://www.csirhrdg.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची मुदत
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १४ डिसेंबर २०१५ पर्यंत अर्ज करावेत. विहित नमुन्यातील आवश्यक तो तपशील भरलेले
आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज सायंटिस्ट इन्चार्ज, ईएमआर- १, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ग्रुप, सीएसआयआर कॉम्प्लेक्स, लायब्ररी अ‍ॅव्हेन्यू, पूसा, नवी दिल्ली- ११००१२ या पत्त्यावर १८ डिसेंबर २०१५ पर्यंत पोहोचतील अशा
बेताने पाठवावेत.