सुहास पाटील suhassitaram@yahoo.com

* भारतीय सेनासामग्री कारखाने (इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरी), अंबरनाथ,

जि. ठाणे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने (PMKV) अंतर्गत डायबिटिस एज्युकेटरच्या ३० पदांवर प्रशिक्षार्थीची भरती.

पात्रता – बारावी उत्तीर्ण (विशेषकरून सायन्स आणि होम सायन्समध्ये.)

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे.

प्रशिक्षण कालावधी – ३६० तास (अंदाजे २-३ महिने सोमवार ते शुक्रवार रोज ८ तास.)

प्रशिक्षार्थीना कोणत्याही प्रकारचे वृत्तीवेतन मिळणार नाही आणि प्रशिक्षण कोणत्याही नोकरीची हमी देत नाही.

प्रशिक्षणाचे स्थळ – फॅक्टरी ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट एफटीआय, सेनासामग्री कारखाना, अंबरनाथ,

जि. ठाणे – ४२१ ५०२.

इच्छुक उमेदवार ‘महाव्यवस्थापक, सेनासामग्री कारखाना, अंबरनाथ, जि. ठाणे – ४२१ ५०२’ या पत्त्यावर स्वयंसाक्षांकित संबंधित गुणपत्रिकांच्या प्रती, जन्मतारखेचा पुरावा, पासबुक/चेकबुकच्या जोडलेल्या प्रतींसह बँक तपशील व अलीकडील फोटोज देऊन लोकसत्ता वर्तमानपत्राच्या

दि. ५ मार्च २०२० मधील संबंधित जाहिरातीत दिलेल्या प्रारूपानुसार अर्ज करू शकतील आणि टपालाद्वारा दि. २५ मार्च २०२० पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत. अर्जाच्या लिफाफ्याच्या वरील भागावर ‘पीएमकेव्हीवायकरिता अर्ज’ असे ठळक अक्षरांत लिहावे.

* मिश्र धातू निगम लिमिटेड (भारत सरकारचा उपक्रम संरक्षण मंत्रालय), हैद्राबाद (जाहिरात क्र. MDN/HR/TRG/RDAT  २०२०-२१ दि. २ मार्च २०२०) – १०४ अ‍ॅप्रेंटिसेस पदांची भरती.

(ए) ग्रॅज्युएट अ‍ॅप्रेंटिसेस – GAT  (इंजिनीअरिंग) – एकूण १४ पदे.

(१) मेटॅलर्जी – ४ पदे.

(२) मेकॅनिकल – ४ पदे,

(३) इलेक्ट्रिकल – ४ पदे,

(४) इन्स्ट्रमेंटेशन – १ पद,

(५) सिव्हिल – १ पद.

पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी.

वॉक इन इंटरव्ह्य़ूचा दिनांक १९ मार्च २०२०

(बी) ट्रेण्ड अ‍ॅप्रेंटिसेस (डिप्लोमा) (TAT) – एकूण १० पदे.

(१) मेटॅलर्जी – २ पदे,

(२) मेकॅनिकल – ३ पदे,

(३) इलेक्ट्रिकल – ३ पदे,

(४) इन्स्ट्रमेंटेशन – १ पद,

(५) सिव्हिल – १ पद.

पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग डिप्लोमा.

वॉक इन इंटरव्ह्य़ूचा दि. १९ मार्च २०२०

(सी) ट्रेड अ‍ॅप्रेंटिसेस (आयटीआय उत्तीर्ण) – एकूण ८० पदे.

(१) फिटर – २५ पदे,

(२) वेल्डर – १० पदे,

(३) टर्नर – १० पदे.

वॉक इन इंटरव्ह्य़ूचा दि. २० मार्च २०२०.

(४) इलेक्ट्रिशियन – २५ पदे,

(५) मशिनिस्ट – १० पदे.

वॉक इन इंटरव्ह्य़ूचा दि. २१ मार्च २०२०

सर्व वॉक इन इंटरव्ह्य़ूची वेळ असेल

सकाळी ९.३० ते ४.३० वाजेपर्यंत.

अ‍ॅप्रेंटिसशिप ट्रेनिंगचा कालावधी सर्व पदांसाठी

१ वर्षांचा असेल.

वॉक इन इंटरव्ह्य़ूचे ठिकाण – ऑडिटोरियम, कॉर्पोरेट हॉस्टेल बिल्डिंग, मिश्र धातू निगम लिमिटेड, पोस्ट कांचनबाग, हैद्राबाद.

निवड पद्धती –

(१) ग्रॅज्युएट अ‍ॅप्रेंटिस (इंजिनीअरिंग) आणि ट्रेण्ड अ‍ॅप्रेंटिसेस पदांसाठी उमेदवारांच्या पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवार इंटरव्ह्य़ूसाठी शॉर्ट लिस्ट केले जातील.

(२) ट्रेड अ‍ॅप्रेंटिसेस (आयटीआय उत्तीर्ण) पदांची निवड.

लेखी परीक्षेतील गुण ५०% वेटेज आणि आयटीआयचे गुण ५०% वेटेज.

शंका समाधानासाठी संपर्क करा

०४० – २३४५०२०/२४१८४४९२

जातीचे दाखले भारत सरकारने लागू केलेल्या प्रारूपामधील असावेत.

शंका समाधानासाठी संपर्क करा

०४०-२४३४५०२० / २४१८४४९२

अर्ज कसा करावा – ग्रॅज्युएट अ‍ॅप्रेंटिसेस (इंजिनीअरिंग) आणि TAT डिप्लोमा पदांसाठी आपले नाव http://www.mhrdnats.gov.in या संकेतस्थळावर रजिस्टर करणे आवश्यक.

ट्रेड अ‍ॅप्रेंटिसेस (आयटीआय उत्तीर्ण) उमेदवारांनी http://www.apprenticeship.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक.

उमेदवारांनी वॉक इन इंटरव्ह्य़ूसाठी असलेल्या दिनांकास सकाळी ९.३० वाजता पोर्टल रजिस्ट्रेशन नंबर, सर्टिफिकेट्स आणि दोन फोटोंसह उपस्थित राहावे.

’     गुजरात स्टेट इलेक्ट्रिसिटी कॉर्पोरेशन लिमिटेड, बडोदरा, गुजरात ‘विद्युत साहाय्यक (प्लांट अटेंडंट ग्रेड-१)’ च्या एकूण १७७ पदांची भरती.

(१) विद्युत साहाय्यक (प्लांट अटेंडंट ग्रेड-१ – इलेक्ट्रिकल) – १११ पदे.

(२) विद्युत साहाय्यक

(प्लांट अटेंडंट ग्रेड-१ – मेकॅनिकल) – ६६ पदे.

पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग डिप्लोमा. (पाचव्या व सहाव्या सेमिस्टर/शेवटच्या वर्षांला किमान ५५% गुण आवश्यक.

पदवीधारक इंजिनीअर्सनी अर्ज करू नयेत.)

एकत्रित वेतन – दरमहा रु. १७,५००/-

पहिल्या वर्षांसाठी.

वयोमर्यादा – ३५ वर्षेपर्यंत

(महिला उमेदवार – ४० वर्षेपर्यंत);

अपंग (एचएच कॅटेगरी ४० – ७५% डिसअ‍ॅबिलिटी) – ४५ वर्षेपर्यंत; अजा/अज/एसईबीसी/ईडब्ल्यूएस – ४० वर्षेपर्यंत.

अर्जाचे शुल्क – रु. ५००/- (खुला गट, एस्ईबीसी आणि इडब्ल्यूएस उमेदवारांसाठी) आणि रु. २५०/- (अजा/अज/अपंग उमेदवारांसाठी.)

निवड पद्धती – ऑनलाइन लेखी परीक्षा

(सेक्शन-१ गुजराती लँग्वेज आणि ग्रामर) – १०%;

सेक्शन-२ जनरल नॉलेज – १०%;

सेक्शन-३ इंग्लिश नॉलेज – १०%;

सेक्शन-४ कॉम्प्युटर नॉलेज – १०%;

सेक्शन-५ मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल विषयावरील प्रश्न (दिलेल्या टॉपिक्सवर आधारित) – ६०%.

एकूण १०० प्रश्न, १०० गुण. प्रत्येक चुकीच्या उत्तराला ०.२५ गुण वजा केले जातील.

गुजरात राज्यातील उमेदवारांमधून ८५ % जागा भरल्या जातील. त्यासाठी त्यांना गुजरात राज्याचा रहिवासी दाखला द्यावा लागेल.

हेल्प डेस्क क्रमांक आहे ०२२-६२५०७७२० कार्यालयीन दिवशी सकाळी १० ते संध्या. ६ वाजेपर्यंत.

ई-मेल आयडी recruit.gsecl@gebmail.com.

ऑनलाइन अर्ज http://www.gsecl.in या संकेतस्थळावर दि. १७ मार्च २०२० (१८.०० वाजे) पर्यंत करावेत.