आयुर्विमा महामंडळातर्फे (एलआयसी) आर्थिकदृष्टय़ा दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती देण्यात येतात. या शिष्यवृत्तींचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
वैद्यकशास्त्र-अभियांत्रिकी यासह कुठल्याही विषयातील पदवी अथवा पदविका : अर्जदार विद्यार्थ्यांनी २०१३-१४ या शैक्षणिक सत्रात बारावीची परीक्षा कमीत कमी ६० टक्केगुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तांत्रिक वा व्यवसायविषयक अभ्यासक्रम : अर्जदार विद्यार्थ्यांनी २०१३-१४ या शैक्षणिक सत्रात दहावीची परीक्षा कमीत कमी
६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. अर्जदार विद्यार्थ्यांच्या पालकांचे सर्व स्रोतांपासूनचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांहून अधिक नसावे.
अधिक माहितीसाठी संपर्क : योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली एलआयसीची ‘सुवर्णजयंती शिष्यवृत्ती’विषयक जाहिरात पाहावी. आयुर्विमा मंडळाच्या शाखा वा मंडळ कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा एलआयसीच्या http://www.licindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०१४ आहे.