27 September 2020

News Flash

कोचिन शिपयार्ड लिमिटेड (भारत सरकारचा उपक्रम) ‘एक्झिक्युटिव्ह ट्रेनी’ पदांची भरती.

इतर पदांची ट्रेनिंग कोची येथे आणि पोस्टिंग देशभरातील प्रोजेक्ट्सवर असेल.

(संग्रहित छायाचित्र)

१) मेकॅनिकल – १६ पदे.

२) इलेक्ट्रिकल – ६ पदे.

३) सिव्हिल – २ पदे.

४) इलेक्ट्रॉनिक्स – २ पदे.

५) सेफ्टी – ४ पदे.

६) इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी – २ पदे. (काही पदे विकलांगांसाठी राखीव.)

पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी किमान ६५% गुणांसह उत्तीर्ण (अजा/अज/विकलांग यांना किमान ५५% गुण आवश्यक). पद क्र. (६) (आयटी)साठी कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग पदवी, कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/आयटीमधील पदव्युत्तर पदवीधारक पात्र आहेत.

७) फायनान्स – २ पदे (सीए/आयसीडब्ल्यूए)

८) ह्युमन रिसोर्स – १ पद (इमाव)

पात्रता – (i) पदवी किमान ६५% गुणांसह उत्तीर्ण. (II) बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एचआर)/पीएम/लेबर वेल्फेअरमधील पदव्युत्तर पदवी किमान ६५% गुणांसह उत्तीर्ण. अंतिम वर्षांच्या परीक्षेस बसलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

वयोमर्यादा – दि. २० ऑगस्ट २०१८ रोजी २७ वष्रेपर्यंत (इमाव – ३० वष्रेपर्यंत, अजा/अज – ३२ वष्रेपर्यंत, विकलांग – ३७ वष्रेपर्यंत)

निवड पद्धती – मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इंजिनीअर्सच्या प्रत्येकी दोन जागा मुंबई पोर्ट ट्रस्टच्या शिप रिपेअरिंग फॅसिलिटी येथे असून त्याचे ट्रेनिंग व पोस्टिंग मुंबई येथे असेल. इतर पदांची ट्रेनिंग कोची येथे आणि पोस्टिंग देशभरातील प्रोजेक्ट्सवर असेल. १ वर्षांच्या ट्रेनिंगदरम्यान दरमहा स्टायपेंड रु. ५०,०००/- दिले जाईल. ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण केल्यास एक्झिक्युटिव्ह ट्रेनी ‘असिस्टंट मॅनेजर ई-१ ग्रेड’ या पदावर नेमले जातील.

निवड पद्धती – फेज-१ ऑब्जेक्टिव्ह टाइप ऑनलाइन टेस्ट (७० गुण) सप्टेंबर २०१८ च्या दुसऱ्या/तिसऱ्या आठवडय़ात घेतली जाईल. (जनरल अवेअरनेस/इंग्लिश लँग्वेज/न्यूमरिकल अ‍ॅबिलिटी, रिझिनग अ‍ॅबिलिटी – प्रत्येकी ५ गुण आणि विषयावर आधारित – ५० गुण). प्रत्येक प्रश्नाला १ गुण असेल. चुकीच्या उत्तराला गुण वजा केले जाणार नाहीत.

फेज – २ – (फेज-१ नंतर सायकोमेट्रिक टेस्ट घेतली जाईल.)

ग्रुप डिस्कशन – १० गुण आणि पर्सनल इंटरव्ह्यू – २० गुण. फेज – १ साठी मुंबई, बंगळूरु, नवी दिल्ली इ. परीक्षा केंद्र असतील. फेज – २ परीक्षा कोची येथे घेतली जाईल.

अ‍ॅप्लिकेशन फी – रु. ७५०/- + बँक चार्जेस (अजा/अज/विकलांग यांना फी माफ आहे.)

ऑनलाइन अर्ज www.cochinshipyard.com या संकेतस्थळावर (careers page) दि. २० ऑगस्ट २०१८ पर्यंत करावेत.

suhassitaram@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2018 4:22 am

Web Title: loksatta job opportunity 28
Next Stories
1 ज्ञानपरंपरेचा वसा नालंदा विद्यापीठ
2 करिअर वार्ता : शिक्षणावरच्या खर्चाची चर्चा
3 अपंग विकास क्षेत्रातील अभ्यासक्रम
Just Now!
X