महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (महापारेषण) अंतर्गत ७ परिमंडलनिहाय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील विभागीय कार्यालयात ‘तांत्रिक कर्मचारी श्रेणी-६’ पदांच्या भरतीसाठी केवळ अर्हताप्राप्त प्रकल्पग्रस्त उमेदवार पात्र आहेत.

  • परिमंडल निहाय रिक्त पदांचा तपशील – अमरावती – १, औरंगाबाद – १२, कराड – १३, नाशिक – १३, नागपूर – २, पुणे -२०, वाशी – ९. एकूण ७० पदे.
  • पात्रता – (दि. ३१ डिसेंबर, २०१७ रोजी) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) यांचे वीजतंत्री व्यवसायातील राष्ट्रीय शिकावू उमेदवारी अप्रेंटिस प्रमाणपत्रधारक प्रकल्पग्रस्त उमेदवार.
  • वयोमर्यादा – दि. ३१ डिसेंबर, २०१७ रोजी १८ ते ४५ वर्षेपर्यंत.
  • परीक्षा शुल्क – रु. ५००/- खुल्या प्रवर्गासाठी (रु. २५०/- मागासवर्गीय उमेदवारांसाठी.)
  • ऑनलाइन परीक्षेकरिता केंद्र – मुंबई, नाशिक, नागपूर, कोल्हापूर. उमेदवारांना तीन परीक्षा केंद्रांचा पर्याय द्यावा लागेल. ऑनलाइन अर्ज जाहिरातीच्या शेवटी देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाइन अर्ज व प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर करावयाची आहेत.
  • निवड पद्धती – लेखी परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. जी वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल. सदर पदाकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, सामान्य अभियोग्यता (जनरल अ‍ॅप्टिटय़ुड) व मराठी भाषेचे ज्ञान यावर आधारित राहील. प्रत्येक चुकीच्या उत्तराला १/४ गुण वजा केले जातील. लेखी परीक्षेचा अंदाजे महिना फेब्रुवारी /मार्च, २०१८.
  • आपले अर्ज mahatransco.in या संकेतस्थळावर दि. ३१ डिसेंबर, २०१७ पर्यंत (रात्री ११.५९ वाजेपर्यंत) करावेत.

 

कँटॉनमेंट बोर्ड, जालंधर येथे १५४  ‘सफाईवाला’ पदांची भरती. (जाहिरात क्र.  JCB/Adm/Rectmnt/2017/ 80/03 दि.२४ नोव्हेंबर, २०१७) (अजा – ४०, इमाव – ५९, यूआर – ५५)

  • पात्रता – इयत्ता आठवी उत्तीर्ण
  • वयोमर्यादा – १८ ते २५ वष्रे. (इमाव -१८ ते २८ वष्रे, अजा/अज – १८ ते ३० वर्षे)
  • अर्जाचे शुल्क – रु. ५००/- खुलागट. (रु. २५०/- राखीव गटांसाठी)
  • https://www.cbjalandhar.org.in/ या संकेतस्थळावर दि. १० जानेवारी, २०१८ पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत. संकेतस्थळावरील नोटीस बोर्ड या पर्यायावर अधिक माहिती मिळेल.