|| सुहास पाटील

स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे ज्युनिअर इंजिनीअर्सची भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन ‘ज्युनियर इंजिनीअर’(सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि क्वांटिटी सव्‍‌र्हेयिंग अँड काँट्रक्ट्स) परीक्षा-२०१८ मधून केंद्र सरकारच्या पुढील विभागात ‘ज्युनियर इंजिनीअर’ पदांची भरती करणार.

१) सेंट्रल वॉटर कमिशन

पात्रता – सिव्हिल/मेकॅनिकल विषयातील इंजिनीअिरग डिप्लोमा किंवा डिग्री.

२) सेंट्रल पब्लिक वर्क्‍स डिपार्टमेंट (सी.पी.डब्ल्यू.डी.)

पात्रता – सिव्हिल/इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल इंजिनीअिरग डिप्लोमा.

३) डिपार्टमेंट ऑफ पोस्ट्स

पात्रता – सिव्हिल इंजिनीअिरग डिप्लोमा.

४) मिलिटरी इंजिनीअिरग सíव्हसेस (एम्ईएस्)

सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल विषयातील इंजिनीअिरग डिग्री किंवा डिप्लोमा (डिप्लोमासाठी २ वर्षांचा अनुभव आवश्यक.)

ज्युनियर इंजिनीअिरग (क्वांटिटी सव्‍‌र्हेयिंग अँड काँट्रक्ट्स) साठी सिव्हिल इंजिनीअिरग डिप्लोमा किंवा इन्स्टिटय़ूट ऑफ सव्‍‌र्हेअर्सकडील बिल्डिंग क्वालिटी सव्‍‌र्हेइंग सब डिव्हिजन- कक ची इंटरमिडिएट परीक्षा उत्तीर्ण.

५) फराक्का बॅरेज प्रोजेक्ट – सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनीअिरग डिप्लोमा.

६) बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन-सिव्हिल इंजिनीअिरग डिग्री किंवा डिप्लोमा. (डिप्लोमा धारकांसाठी २ वर्षांचा अनुभव आवश्यक.)

७) सेंट्रल वॉटर पॉवर रिसर्च स्टेशन – सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनीअिरंग डिप्लोमा.

८) डायरेक्टोरेट ऑफ क्वालिटी अ‍ॅश्युरन्स (नेव्हल) – इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअिरग डिग्री किंवा डिप्लोमा (डिप्लोमासाठी २ वर्षांचा अनुभव आवश्यक.)

९) नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन – सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनीअिरग डिप्लोमा.

वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट २०१९ रोजी

पद क्र. १ व २ साठी ३२ वर्षेपर्यंत;

पद क्र. ३ व पद क्र. ४ मधील ज्युनियर इंजिनीअिरग (क्वालिटी सव्‍‌र्हेियग अँड काँट्रक्ट्स पदासाठी – २७ वर्षेपर्यंत इतर पदांसाठी ३० वर्षेपर्यंत.

(वयात सूट इमाव – ३ वर्षेपर्यंत, अजा/अज – ५ वर्षेपर्यंत, दिव्यांग – १०/१३/१५ वर्षेपर्यंत.)

वेतन – पे-मॅट्रिक्स लेव्हल-६ सेंट्रल पे कमिशन सातवा आयोगानुसार दरमहा वेतन रु. ५१,०००/- (काही पदे दिव्यांग ओएच/व्हीएच/एचएच/इतर यांसाठी राखीव असतील.)

अर्जाचे शुल्क – रु. १००/- (महिला/अजा/अज/ अपंग यांना फी माफ.)

परीक्षा केंद्र – अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पुणे, पणजी इ.

निवड पद्धती –

१) कॉम्प्युटर बेस्ड् परीक्षा – पेपर-१ एकूण २०० गुण, वेळ २ तास.

ऑब्जेक्टिव्ह टाइप दि. २३ ते २७ सप्टेंबर २०१९. ( जनरल इंटेलिजन्स अँड रिझिनग,  जनरल अवेअरनेस प्रत्येकी ५० प्रश्न / ५० गुण,  जनरल इंजिनीअिरग सिव्हिल अँड स्ट्रक्चरल/मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल) १०० प्रश्न, १०० गुण. प्रत्येक चुकीच्या उत्तराला ०.२५ गुण वजा केले जातील.

२) पेपर – २ (वर्णनात्मक) – दि. २९ डिसेंबर २०१९ रोजी (जनरल इंजिनीअिरग सिव्हिल अँड स्ट्रक्चरल/ इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) ३०० गुण, वेळ २ तास.

कॉम्प्युटर बेस्ड परीक्षेचे हॉलतिकीट sscwr.net या संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

ऑनलाइन अर्ज www.ssconline.nic.in या संकेतस्थळावर दि. २५ फेब्रुवारी २०१९ (सायं. ५.०० वाजे) पर्यंत करावेत.  फी भरण्याची अंतिम तारीख २७ फेब्रुवारी २०१९ आहे.

suhassitaram@yahoo.com