|| सुहास पाटील

केंद्रीय लोकसेवा आयोग ३२३ ‘असिस्टंट कमांडंट’ पदांच्या भरतीसाठी सेंट्रल आम्र्ड पोलीस फोस्रेस (असिस्टंट कमांडंट्स) एक्झामिनेशन २०१९ दि. १८ ऑगस्ट २०१९ रोजी घेणार आहे.

रिक्त पदांचा तपशील –

(१) बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बीएसएफ) – १०० पदे,

(२) सेंट्रल रिझव्‍‌र्ह पोलीस फोर्स (सीआरपीएफ) – १०८ पदे,

(३) सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (सीआयएसएफ ) – २८ पदे,

(४) इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) – २१ पदे आणि सशस्त्र सीमा बल (एसएसबी) – ६६ पदे (१०% पदे माजी सनिकांसाठी राखीव आहेत.)

परीक्षा केंद्र – मुंबई, नागपूर, पणजी (गोवा) इ. प्रथम येणाऱ्यास प्रथम या नियमाने उमेदवारांना परीक्षा केंद्र निवडीची सोय असेल. चेन्नई, कलकत्ता आणि नागपूर केंद्र वगळता इतर केंद्रांवर ठरावीकच उमेदवारांना सामावून घेतले जाऊ शकते. आपल्या पसंतीचे परीक्षा केंद्र मिळविण्यासाठी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

पात्रता – पदवी उत्तीर्ण (कोणतीही शाखा) अंतिम वर्षांचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. (पुरुष व महिला उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.) एनसीसी बी किंवा सी प्रमाणपत्रधारकांना प्राधान्य दिले जाईल.

वयोमर्यादा – १ ऑगस्ट २०१९ रोजी २० ते २५ वर्षे. (इमाव – २८ वर्षेपर्यंत, अजा/अज – ३० वर्षेपर्यंत, केंद्र सरकारी कर्मचारी – ३० वर्षेपर्यंत)

शारीरिक मापदंड –

उंची – पुरुष – १६५ सें.मी., महिला – १५७ सें.मी.

छाती – पुरुष – ८१-८६ सें.मी.

वजन – (उंची/वय यांच्या प्रमाणात) पुरुष – ५० किलो, महिला – ४६ किलो.

दृष्टी –

(करेक्टेड व्हिजन) दूरची दृष्टी – चांगला डोळा ६/६ किंवा ६/९आणि खराब डोळा ६/१२ किंवा ६/९.

जवळची दृष्टी (करेक्टेड व्हिजन) एन-६, एन-९.

परीक्षा शुल्क – रु. २००/-. (महिला/अजा/अज यांना फी माफ आहे.)

निवड पद्धती –

(१) लेखी परीक्षा

पेपर -१ – जनरल अ‍ॅबिलिटी अँड इंटेलिजन्स (ऑब्जेक्टिव्ह टाइप २५० गुण, वेळ ३ तास.)(जनरल मेंटल अ‍ॅबिलिटी, जनरल सायन्स, चालू घडामोडी, इंडियन पोलिटी अँड इकॉनॉमी, भारताचा इतिहास, भारताचा आणि जगाचा भूगोल)

पेपर – २ – जनरल स्टडीज, ८० गुण, (आधुनिक भारताचा इतिहास, मानव अधिकार, भूगोल इ.) आणि निबंध (हिंदी किंवा इंग्रजीमधून) आणि कॉम्प्रिहेन्शन – १२० गुण. एकूण २०० गुण.

(२) शारीरिक मापदंड/शारीरिक क्षमता चाचणी आणि वैद्यकीय तपासणी – शारीरिक क्षमता चाचणी (पीईटी) – (ए) १०० मी. धावणे – पुरुष १६ सेकंदांत, महिला – १८ सेकंदांत, (बी) ८०० मी.

धावणे –

पुरुष – ३ मि. ४५ सेकंदांत,

महिला – ४ मि. ४५ सेकंदांत,

(सी) लांब उडी – पुरुष – ३.५ मी., महिला – ३.० मी.,

(डी) गोळाफेक (७.२६ किलो) – पुरुष – ४.५ मी.

(३) मुलाखत – १५० गुण.

अंतिम निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीमधील गुणवत्तेनुसार.

ऑनलाइन अर्ज  https://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर दि. २० मे २०१९ (१८.०० वाजे) पर्यंत करावेत.

suhassitaram@yahoo.com