राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची प्रवेशपरीक्षा

यूपीएससीद्वारे घेण्यात येणारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची (एनडीए) आणि नौदल प्रबोधिनीची प्रवेशपरीक्षा १७ एप्रिल २०१६ रोजी होणार आहे. एनडीएतील एकूण पदे- ३२० (२०८ भूदल, ४२ नौदल, ७० हवाई दल) नेव्हल अ‍ॅकॅडमीतील एकूण पदे- ३५.    २ जुलै १९९७ ते १ जुलै २००० दरम्यान जन्म झालेल्या अविवाहित पुरुषांना याकरता अर्ज करता येईल. अर्हता- भूदलाकरता – बारावी उत्तीर्ण. नौदल आणि हवाई दलाकरता-   पदार्थविज्ञानशास्त्र/ गणित विषय घेऊन बारावी. शुल्क- १०० रु. (अजा/अजसाठी शुल्क माफ) उंची – किमान १५७ सेंमी (हवाई दलासाठी किमान १६२.५सेंमी) ऑनलाइन पद्धतीने अर्ज www.upscoline.gov.in या वेबसाइटवर २९ जानेवारी २०१६ पर्यंत. सविस्तर माहिती www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मॅथेमॅटिक्स ट्रेिनग आणि टॅलेन्ट सर्च प्रोग्राम 

गणित विषयात गती असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल बोर्ड फॉर हायर मॅथेमॅटिक्सच्या पुढाकाराने ‘एम टी अ‍ॅण्ड टी एस २०१६’ हा उन्हाळी प्रशिक्षण उपक्रम आयोजित करण्यात येतो. हा उपक्रम तीन स्तरांवर राबवला जातो. १) लेव्हल ‘0’- गणित विषयाच्या द्वितीय वर्ष बी.एस्सी. विद्यार्थ्यांसाठी. २) लेव्हल । – गणित विषयाच्या तृतीय वर्ष बी.एस्सी. विद्यार्थ्यांसाठी. ३) लेव्हल ॥ – गणित विषयात एम.एस्सी. करणाऱ्या प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी. एमटीटीएस उपक्रम तीन वेगवेगळ्या ठिकाणी घेतला जातो- ल्ल  आयआयटी, मद्रास – २३ मे ते १८ जून २०१६. ल्ल  रिजनल इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशन, मसूर- १६ मे ते ११ जून  २०१६. ल्ल  शिव नाडर युनिव्‍‌र्हसिटी, नॉयडा, उत्तर प्रदेश- मे ते २५ जून २०१६, प्रवेशाकरता  accounts.mtts.org.in या वेबसाइटवर २० फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करावा.  निवड झालेल्या उमेदवारांना जाण्या-येण्याचे रेल्वेभाडे (स्लीपर क्लास) दिले जाईल आणि राहण्या-जेवणाची विनामूल्य सोय केली जाईल.

नॅशनल एन्ट्रन्स स्क्रीिनग टेस्ट – २०१६ (ठएरळ- 2016) 

पाच वर्षांचा इंटिग्रेटेड एम.एस्सी. प्रोग्राम (जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांत). एनआयएसईआर भुवनेश्वर आणि मुंबई विद्यापीठाचा अणू ऊर्जा विभाग, सेंटर ऑफ एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस (UM-DAE-CBS), मुंबई येथे प्रवेश. पात्रता- बारावी विज्ञान शाखा (जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, पदार्थविज्ञानशास्त्र यांपैकी विषयासंह)  २०१४, २०१५ अथवा २०१६चे विद्यार्थी असावेत. किमान ६० टक्के गुण आवश्यक (अजा/अज साठी ५५ टक्के गुण) वयोमर्यादा – १ ऑगस्ट १९९६ नंतरचा जन्म असावा. (अजा/अजसाठी ५ वर्षांनी शिथिलक्षम). एनआयएसईआरमध्ये १३२ जागा आणि सीबीएसमध्ये ४७ जागांसाठी प्रवेश. नेस्ट २०१६ परीक्षा २८ मे २०१६ रोजी सकाळी १० ते दु. १ या वेळेत होईल. अर्ज  ऑनलाइन पद्धतीने www.nestexam.in या संकेत स्थळावर ४ मार्च २०१६ पर्यंत करावा.

स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी प्रवेश

पुण्याच्या बार्टी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत विविध स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी अनुसूचित जातींच्या पदवीधर उमेदवांराकरता तीन महिन्यांचा फाऊंडेशन प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पात्र उमेदवांराकडून २५ जानेवारी २०१६ पर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. निवड झालेल्या प्रत्येक उमेदवाराला तीन हजार रु. विद्यावेतन मिळेल. अर्हता-  उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अनुसूचित जातीमधील असावा व पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. उमेदवारांची निवड १४ फेब्रुवारी २०१६ रोजी होणाऱ्या चाळणी परीक्षेतून केली जाईल. अर्जाचा नमुना व अधिक माहितीसाठी barti.maharashtra.in ला भेट द्यावी.