अपंगांसाठी काम करणाऱ्यांसाठी नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ मल्टिपल डिसॅबिलिटीज, चेन्नई येथे उपलब्ध असणाऱ्या खालील अभ्यासक्रमांच्या २०१८-१९ या शैक्षणिक सत्रात प्रवेश उपलब्ध आहेत.

*  सर्टिफिकेट कोर्स इन केअर गिव्हिंग- अभ्यासक्रमाचा कालावधी ३ महिने.

आवश्यक पात्रता- अर्जदार आठवी उत्तीर्ण व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत.

*   सर्टिफिकेट कोर्स इन केअर गिव्हिंग- प्रगत अभ्यासक्रम- अभ्यासक्रमाचा कालावधी ६ महिने.

आवश्यक पात्रता- अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांनी केअर गिव्हिंगमधील प्राथमिक अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

*   सर्टिफिकेट कोर्स इन केअर गिव्हिंग- उच्च अभ्यासक्रम- अभ्यासक्रमाचा कालावधी १० महिने.

आवश्यक पात्रता- अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत.

अर्जासह पाठवायचे शुल्क- अभ्यासक्रमासाठी भरावयाचे प्रवेश शुल्क म्हणून १०० रु. भरणे आवश्यक आहे.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ मल्टिपल डिसॅबिलिटीज, चेन्नईची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://niepmd.tn.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख- संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि प्रवेश शुल्कासह असणारे प्रवेश अर्ज डायरेक्टर, नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ मल्टिपल डिसॅबिलिटीज, मयुकुडू, ईस्ट कोस्ट रोड कोवलम, चेन्नई- ६०३११२ या पत्त्यावर १५ ऑगस्ट २०१८ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

– द.वा. आंबुलकर