जिओलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियामध्ये ‘ग्रुप ए’ची जिओलॉजिस्ट- १२१ पदे, जिओफिजिसिस्ट- ५६ पदे आणि केमिस्ट- २९ पदे यांकरता १३ मे २०१६ रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे.

वयोमर्यादा : १ जाने २०१६ रोजी

२१ ते ३२ वष्रे. अजा/ अज- कमाल ३७ वष्रे, इमाव- कमाल ३५ वष्रे; विकलांग- कमाल ४२ वष्रे.

शैक्षणिक पात्रता : (अ) जिओलॉजिस्ट- एमएस्सी (जिओलॉजिकल सायन्स/ जिओलॉजी/ अ‍ॅप्लाइड जिओलॉजी आणि समतुल्य) (ब) जिओलॉजिस्ट- एमएस्सी (फिजिक्स/ अप्लाइड फिजिक्स/ जिओलॉजी.

(क) केमिस्ट- एमएस्सी (केमिस्ट्री/ अ‍ॅप्लाइड केमिस्ट्री/ अ‍ॅनालिटिकल केमिस्ट्री. शुल्क- रु. २००. (महिला/ अजा/ अज/ विकलांग यांना शुल्क माफ)

अर्ज ऑनलाइन पद्धतीने www.upsconline.nic.in वर ४ मार्च २०१६ पर्यंत करावा.