07 March 2021

News Flash

मुख्य परीक्षेला सामोरे जाताना..

एमपीएससीची मुख्य परीक्षा पुढील आठवडय़ात सुरू होत आहे.

| September 7, 2015 02:02 am

एमपीएससीची मुख्य परीक्षा पुढील आठवडय़ात सुरू होत आहे. तयारीच्या या शेवटच्या टप्प्यात अभ्यासाचे नियोजन कसे असावे, हे पाहुयात.राज्य सेवा परीक्षा अवघ्या काही दिवसांत सुरू होतील. अनिवार्य मराठी व इंग्रजी या प्रश्नपत्रिकांचे पारंपरिक स्वरूप बदलून वस्तुनिष्ठ करण्याचा विचार आयोगाकडून होत आहे. हा बदल मान्य झाला तर तो पुढच्या राज्य सेवा परीक्षेपासून लागू होईल व त्याचीच शक्यता जास्त आहे. त्या दृष्टीने पाहिल्यास पारंपरिक मराठी व इंग्रजी पेपर्सचे हे शेवटचे वर्ष आहे.मुख्य परीक्षेतील इतर चार प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ असल्यामुळे उत्तम गुण मिळवण्यासाठी मराठी व इंग्रजी या पारंपरिक प्रश्नपत्रिकांची मोठी मदत होत असे. गुणांच्या स्पर्धेत अव्वल येण्यासाठी या प्रश्नपत्रिका व्यवस्थित सोडवणे आवश्यक आहे. त्याकरता काही गोष्टी विशेष ध्यानात घ्याव्यात-

अक्षर सुवाच्च असावे.

खाडाखोड टाळावी.

खोडायचे असल्यास एकच आडवी रेघ मारावी. खोडायच्या शब्दावर खूप साऱ्या रेघोटय़ा मारत ओंगळवाणा प्रकार करू नये.

व्हाइटनर वापरण्यास परवानगी नाही हे लक्षात असू द्यावे.

नव्या संदर्भ साहित्याचे वाचन करू नये. फक्त केलेल्या अभ्यासाची उजळणी करावी. पूर्वपरीक्षेच्या बाबतीत सामान्य अध्ययनाची उजळणी व कल चाचणीचा सराव असे तंत्र असावे.

शेवटच्या आठवडय़ात हलका व योग्य आहार घ्यावा. पुरेशी झोप घ्यावी. शक्य असल्यास आदल्या दिवशी परीक्षा केंद्र पाहून यावे.

परीक्षेच्या दिवशी..
परीक्षेला जाताना नवे वाचन, नवे पाठांतर अजिबात करू नका. टिपणं अथवा पुस्तक वाचावे वाटल्यास जरूर वाचा, अन्यथा राहू द्या. शांतपणे परीक्षेला जा. परीक्षा केंद्रावर अफाट गर्दी दिसेल. त्यापकी काहींनी जास्त अभ्यास केला असेल तर काहींनी कमी केला असेल. परीक्षेसाठी केलेल्या तयारीवर अनेकजण समाधानी असतील तर काही असमाधानी. पण सर्वाचा खरा कस लागणार आहे तो परीक्षा हॉलमधील दोन तासांत. स्वत:चा आत्मविश्वास ढळू न देता तुम्ही स्वत:ला परीक्षेसाठी कसे तयार करता, प्रत्यक्ष परीक्षा हॉलमध्ये संयम व आत्मविश्वासाने कसे पेपर सोडवता यावर तुमचे यश अवलंबून आहे. प्रश्नपत्रिका तुमच्या हाती पडेल त्याक्षणी जास्त/कमी अभ्यास केलेले, स्वत:च्या अभ्यासावर समाधानी/असमाधानी असे सर्वच उमेदवार एका िबदूवर असतील. खरी स्पर्धा त्या क्षणापासून सुरू होते. परीक्षेच्या दोन तासांत तुम्ही कशी कामगिरी बजावता यावर तुमचे भविष्य ठरेल.

परीक्षागृहातील वेळेचे नियोजन
परीक्षा हॉलमध्ये उत्तरपत्रिका मिळाल्यावर तुमचा क्रमांक, विषय, केंद्र इत्यादी माहिती खाडाखोड न करता काळजीपूर्वक भरावी. चौकटीत लिहिलेले आकडे, अक्षरे आणि त्यांच्या खालील माìकग यात फरक असू नये याची काळजी घ्यावी. लक्षात ठेवा, ही उत्तरपत्रिका डटफ  शीट असल्याने खाडाखोड, फाटणे, चुरगळणे, खराब होणे अशा गोष्टींमुळे तपासलीच जात नाही.

प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर आधी कोड उत्तरपत्रिकेत नोंदवा.

संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचत बसू नका. प्रश्नपत्रिका हाती पडल्यानंतर लगेचच सोडवायला सुरुवात करा. जे प्रश्न सोडवता येतात ते सोडवून पेन्सिलने उत्तराला खूण करत पुढे जात राहा.

एखाद्या प्रश्नाबाबत संभ्रम असल्यास अथवा तो प्रश्न अवघड वाटल्यास त्या प्रश्न क्रमांकाला खूण करून पुढील प्रश्नाकडे वळावे. असे करत प्रश्न सोडवायची पहिली फेरी संपवा. जेवढे प्रश्न सोडवले आहेत त्यांचे उत्तरपत्रिकेत माìकग करून घ्या.

आता दुसऱ्या फेरीत अवघड वाटणारे प्रश्न सोडवायचा पुन्हा प्रयत्न करा. आधीच खुणा केल्याने हे प्रश्न शोधत बसण्यात वेळ वाया जात नाही.

थोडासा गोंधळ उडवणारे ओळखीचे प्रश्न सोडवताना आपल्या अंत:प्रेरणेवर विश्वास ठेवा. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही गोष्ट सामोरी आली आहे की, विद्यार्थ्यांला सर्वात पहिल्यांदा जे उत्तर योग्य आहे असे वाटलेले असते, तेच बहुतेक वेळा अचूक असते.

अवघड वाटणारे प्रश्न सर्वात शेवटी सोडवण्याचा प्रयत्न करा, मात्र जोपर्यंत आपण ‘शोधलेले’ उत्तर अचूक आहे याची खात्री वाटत नाही तोपर्यंत उत्तरपत्रिकेत माìकग करू नका. अनोळखी वाटणाऱ्या प्रश्नांना हातलावू नका, अन्यथा निगेटिव्ह माìकगमुळे वजा होणारे गुण महागात पडू शकतात.
एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की, एमपीएससीच्या उत्तरपत्रिका या non leaded OMR sheet स्वरूपाच्या असतात. यांचे माìकग बॉलपेनने करायचे असते. त्यामुळे काळजीपूर्वक माìकग करा. एकापेक्षा जास्त गोळे रंगवल्यास ते उत्तर तपासले जात नाही. त्यामुळे ‘चुकून’ तुम्ही चुकीचा गोळा रंगवला असेल तर लक्षात आल्याबरोबर त्याच्या शेजारचा गोळाही रंगवून टाका. जेणेकरून ‘निगेटिव्ह माìकग’चा फटका बसणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2015 2:02 am

Web Title: with the examination
टॅग : Mpsc Exams
Next Stories
1 निबंधलेखनाची तयारी
2 इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटची कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट
3 नवी संधी
Just Now!
X