scorecardresearch

Premium

GATE 2023 परीक्षेसाठी विना शुल्क नोंदणी करण्याचा आजचा शेवटचा दिवस; ‘ही’ कागदपत्रे आवश्यक

आयआयटी कानपूरने गेट परीक्षा २०२३ साठीची नोंदणी प्रक्रिया ३० ऑगस्टला सुरु केली होती. आज या नोंदणी प्रक्रियेचा शेवटचा दिवस आहे.

gate 2023
गेट २०२३ परीक्षेसाठी नोंदणी करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. (प्रातिनिधिक फोटो : Pixabay)

GATE 2023 : यंदा आयआयटी कानपुरद्वारा आयोजित केल्या जाणाऱ्या गेट २०२३ परीक्षेसाठी नोंदणी करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. यानंतर ७ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी केल्यास उमेदवाराला ५०० रुपये लेट फी भरावी लागेल. आयआयटी कानपूरने गेट परीक्षा २०२३ साठीची नोंदणी प्रक्रिया ३० ऑगस्टला सुरु केली होती. आज या नोंदणी प्रक्रियेचा शेवटचा दिवस आहे.

याशिवाय, गेट २०२३ च्या परीक्षेत बसण्यासाठी उमेदवारांना प्रति प्रश्नपत्रिका १७०० रुपये या दराने परीक्षा शुल्क भरावे लागेल, याचीदेखील आज अंतिम तारीख आहे. याव्यतिरिक्त, उमेदवार ११ नोव्हेंबरपर्यंत अतिरिक्त शुल्क भरून अर्जात सुधारणा करू शकतील.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
hunger strike, Rohit Patil, Health deteriorated, sangli
उपोषण सुरु करताच रोहित पाटलांची प्रकृती खालावली

ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी अद्याप नोंदणी केलेली नाही ते gate.iitk.ac.in या वेबसाइटला भेट देऊन नोंदणी करू शकतात. विनाशुल्क नोंदणी करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. याअंतर्गत उमेदवारांना प्रथम नोंदणी करावी लागेल आणि नंतर नोंदणीकृत तपशीलांसह लॉग इन करून अर्ज सबमिट करावा लागेल. त्यानंतर उमेदवारांना विहित परीक्षा शुल्क भरून त्यांचा गेट अर्ज २०२३ सादर करावा लागेल.

गेट २०२३ परीक्षेच्या ऑनलाइन अर्जादरम्यान उमेदवारांनी पुढील कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करणे आवश्यक आहे.

  • उमेदवाराचा फोटो
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • एससी किंवा एसटीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • आधार किंवा पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 30 september is the last day for free registration for gate 2023 exam these documents required pvp

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×