नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅग्रीकल्चर एक्स्टेंशन मॅनेजमेंट, हैदराबादतर्फे घेण्यात येणाऱ्या कृषी व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका- पीजीडीएम (एबीआय) २०१४-१६ या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या निवड परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत-
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी कुठल्याही विषयातील पदवी परीक्षा कमीत कमी ५०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. अपंग व राखीव गटातील उमेदवारांसाठी गुणांची अट ४५% पर्यंत शिथिलक्षम आहे. वरील शैक्षणिक पात्रतेशिवाय अर्जदार विद्यार्थ्यांनी सीएटी- २०१३ ही प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांमधून त्यांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व सीएटी निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांची या अभ्यासक्रमांसाठी अंतिम निवड करण्यात येईल.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल एक्स्टेंशन मॅनेजमेंटच्या दूरध्वनी क्र. ०४०-२४०१४५२७ अथवा २४०१५२०८ वर संपर्क साधावा अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.manage.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील, कागदपत्र आणि शुल्कासह असणारे प्रवेश अर्ज नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल एक्स्टेंशन मॅनेजमेंट, राजेंद्रनगर, हैदराबाद ५०००३० या पत्त्यावर ३० डिसेंबर २०१३पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agriculture management post graduate diploma
First published on: 23-09-2013 at 08:30 IST