रोहिणी शहा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपत्ती व्यवस्थापन हा राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमधील पेपर चारचा महत्त्वाचा घटक आहेच. शिवाय पूर्वपरीक्षा व इतर परीक्षांमधील चालू घडामोडींचाही महत्त्वाचा घटक असल्याने याचा आढाव घेणे आणि संकल्पनात्मक बाबी समजून घेणे आवश्यक आहे. ओदिशामध्ये ऑक्टोबर २०१८मध्ये आलेल्या तितली या चक्रीवादळाबाबत व आनुषंगिक परीक्षोपयोगी मुद्दय़ांबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

तितली चक्रीवादळ

ऑक्टोबर २०१८ मधील तितली चक्रीवादळास भारतीय हवामान खात्याने अत्यंत दुर्मीळ चक्रीवादळाचा दर्जा दिला आहे. त्यानंतर प्रादेशिक एकीकृत बहुधोके इशारा यंत्रणा (फकटएर) या संयुक्त राष्ट्राच्या संघटनेकडूनही या चक्रीवादळास अत्यंत दुर्मीळ दर्जा देण्यात आला आहे. राइम्सने ओदिशा किनाऱ्यासहित अन्यत्र झालेल्या चक्रीवादळांमध्ये गेल्या २०० वर्षांत अशा प्रकारचे चक्रीवादळ आलेले नसल्याची नोंदही केलेली आहे. वित्तहानी खूप झाली असली तरी त्यामागे या चक्रीवादळाचे वैशिष्टय़पूर्ण असणे व त्याची विध्वंस क्षमता जास्त असणे ही कारणे आहेत.

या वादळाला अत्यंत दुर्मीळ म्हणण्यामागे त्याची पुढील वैशिष्टय़े विचारात घेण्यात आली आहेत.
*   वादळाची दिशा वारंवार बदलणे.

*   भूभागावर प्रवेश केल्यावर वादळाची दिशा बदलणे.

*   किनारी प्रदेशापासून दोन किमी आत प्रवास झाल्यावर दिशा बदलणे.

*   अत्यंत विध्वंसक्षमता

या वादळाला ‘अत्यंत तीव्र चक्रीवादळ’ श्रेणीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. सन १९९९च्या कलसी चक्रीवादळामधील विध्वंसानंतर ओदिशामध्ये व्यापक व कार्यक्षम आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा विकसित करण्यात आली. त्याचा प्रभाव म्हणून फायलिन वादळाच्या वेळी कमीतकमी जीवित हानीचे प्रमाण किमान पातळीवर ठेवण्यास यश आले. मात्र तितली वादळाच्या दुर्मीळ स्वरूपामुळे हानीस अपेक्षित प्रमाणात मर्यादा घालण्यात या यंत्रणेला अपयश आल्याचे दिसले.

आनुषंगिक मुद्दे

वादळांच्या श्रेणी

*  श्रेणी एक (साधारण उष्ण कटिबंधीय वादळ) 2   वाऱ्याचा वेग ताशी ९० ते १२५ किमी. सर्वात कमी नुकसान.

*  श्रेणी दोन (तीव्र उष्ण कटिबंधीय वादळ ) – वाऱ्याचा वेग ताशी १२५ ते १६४ किमी. घरांचे मामुली व काही पिकांचे तीव्र नुकसान तसेच वीजपुरवठय़ामध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता.

*  श्रेणी तीन (अतितीव्र उष्ण कटिबंधीय वादळ) – वाऱ्याचा वेग ताशी १६५ ते २२४ किमी. नुकसानाची पातळी व तीव्रता वाढणे.

*  श्रेणी चार (अतितीव्र उष्ण कटिबंधीय वादळ) 2   वाऱ्याचा वेग ताशी २२५ ते २७९ किमी. वाऱ्याबरोबर कचरा वाहून येणे तसेच मालमत्तांना तीव्र नुकसान.

*  श्रेणी पाच – (अत्यंत तीव्र उष्ण कटिबंधीय वादळ) – वाऱ्याचा वेग ताशी २८० किमी.पेक्षा जास्त. कमी नुकसान.

चक्रीवादळांचे नामकरण

वैज्ञानिक किंवा पारिभाषिक संज्ञा लक्षात येणे व राहणे यापेक्षा ओळखीची नावे लक्षात राहणे हे सामान्य नागरिकांसाठी जास्त सहज व सोपे असते. वादळांसाख्या नसíगक आपत्तीमध्ये नागरिकांना सूचना देणे, त्यांचा सहभाग वाढविणे अशा बाबींसाठी तसेच परिस्थितीचे वेगळेपण लक्षात यावे यासाठी वादळांना त्या त्या प्रदेशातील लोकांना ओळखीची असलेली नावे देण्यात येतात. िहद महासागर प्रदेशातील वादळांना नावे देताना संबंधित देशांकडून क्रमाने नावे देण्यात येतात. तितली हे या वादळाचे नाव पाकिस्तानकडून देण्यात आले आहे.

भारतातील नसíगक आपत्ती व्यवस्थापन

सन १९९० ते २००० हे आंतरराष्ट्रीय नसíगक आपत्तीशमन दशक म्हणून साजरे केले जाणे आणि सन १९९९ मधील ओदिशा चक्रीवादळ व सन २००१मधील भूज भूकंप या आपत्ती या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून भारतामध्ये नसíगक आपत्ती व्यवस्थापनासाठी गांभीर्याने प्रयत्न करण्याची आवश्यकता लक्षात येऊ लागली. त्या दृष्टीने या क्षेत्रामध्ये देशात झालेले प्रयत्न व हाती घेण्यात आलेले उपक्रम पुढीलप्रमाणे.

*   राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५

*   राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना

*   दूरसंवेदन उपग्रह – हवामानाचा अंदाज वर्तवणे आणि आपत्तींचे इशारे प्राप्त करणे या उद्देशाने कठरअळ, कफर या प्रणालीतील उपग्रहांच्या माध्यमातून हवामानाची माहिती प्राप्त करणे.

*   राज्यांच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा

*   महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन कायदा

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about disaster management lessons
First published on: 30-11-2018 at 03:20 IST