भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेत विविध पदांसाठी मोठी भरती करण्यात येत आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना १४ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. दरम्यान विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ११२८ जागा भरल्या जाणार आहेत. पदांच्या एकूण ११२८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हे अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑफलाईन अर्ज करिता दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधावा. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर २०२१ आहे.

रिक्त पदे

वैद्यकीय अधिकारी

Nagpur, Maherghar, safe delivery
नागपूर : सुरक्षित प्रसूतीसाठी चार माहेरघर कधी?
mumbai municipal corporation trees marathi news
मुंबईतील २२ हजार झाडांची छाटणी पूर्ण, ४ हजार ९०९ आस्थापनांना नोटीस बजावली
tax department of the pcmc collect rs 977 crore 50 lakhs in financial year 2023 24
महापालिका मालामाल…पिंपरी- चिंचवडकरांनी भरला कोट्यवधींचा कर
Navi Mumbai Municipal Corporation
३१ मार्चपूर्वी मालमत्ता कर भरण्याचे नवी मुंबई महापालिकेचे आवाहन

भिषक तज्ञ

बालरोग तज्ञ

हॉस्पिटल मॅनेजर

स्टाफ नर्स

फार्मासिस्ट

प्रयोगशाळा तंत्रज्ञ

ए. एन. एम.

एक्स-रे तंत्रज्ञ

वॉर्डबॉय

या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, पगार यांचा सविस्तर तपशील भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

अधिक माहिती वाचण्यासाठी खाली दिलेली PDF स्वरुपातली जाहिरात वाचावी.

https://drive.google.com/file/d/1g7MZT6Et4jO9Zkoo1QNh17-DL7_YIm8E/view

या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १५ हजार ते ६० हजार रुपयांपर्यंत पगार देण्यात येणार आहे. दरम्यान पदसंख्या व भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा बदल करण्याचा अधिकार भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेकडे असणार आहे.

या पत्त्यावर अर्ज पाठवा

उमेदवार भरतीसाठीचा अर्ज bncmc.gov.in या अधिकृत वेबसाईटवरून प्राप्त करु शकतात. तसेच उमेदवारांनी bncmc.est@gmail.com ईमेलआयडीवर अर्ज पाठवायचा आहे. त्यानंतर अर्जाची प्रिंट आस्थापना विभाग, भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, पहिला मजला, दालन क्र. १०६, नवीन प्रशासकीय इमारत, काप-आळी, भिवंडी, जि. ठाणे या पत्त्यावर पाठवायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर २०२१ असणार आहे.