scorecardresearch

MAHATRANSCO Recruitment 2021: दहावी व ITI पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी; जाणून घ्या तपशील

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत पुणे इथे दहावी आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी भरती

MAHATRANSCO Recruitment 2021: दहावी व ITI पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी; जाणून घ्या तपशील
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२१ आहे.( photo: प्रतींनिधीक)

सरकारी नोकरीच्या शोधत असणार्‍या उमेदवारांना आता पुणे येथे मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत पुणे इथे दहावी आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इलेक्ट्रिशियन अप्रेन्टिस या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२१ असणार आहे.

या पदांसाठी होणार भरती

इलेक्ट्रिशियन अप्रेन्टिस – एकूण २१ पदे

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

इलेक्ट्रिशियन अप्रेन्टिस या पदासाठी अर्ज करणार्‍या इच्छुक उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसेच संबंधित पदाच्या गरजेनुसार ITI प्रशिक्षण घेतलं असलेले देखील आवश्यक आहे.

अशी होणार निवड प्रक्रिया

यासाठी उमेदवारांचे दहावीचे गुण आणि ITI मधील चारही सत्रांच्या गुणांची बेरीज करून सरासरी काढण्यात येईल. त्यानुसार उमेदवरांची निवड केली जाईल. इतर कुठलेही गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत.

आवश्यक कागदपत्रं

उमेदवारांची निवड प्रक्रिया झाल्यावर मुलखातीला येताना पासपोर्ट साईझ फोटो, कोणतंही एक ओळखपत्र, ऑनलाईन रजिस्ट्रेशनची कागदपत्रं, शैक्षणिक पात्रतेसंबंधीची कागदपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र या सर्व कागदपत्रांची एक प्रत सोबत बाळगणं आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२१ आहे.

या पदभरतीसाठी उमेदवार भरतीसाठीचा अर्ज http://www.mahatransco.in या अधिकृत वेबसाईटवर प्राप्त करू शकतात.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-09-2021 at 16:32 IST

संबंधित बातम्या