राज्यशास्त्र विषय घेऊन बीए केल्यास करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध होतील?
– सागर रौंडल
राज्यशास्त्र विषयामध्ये तुम्ही पदव्युत्तर पदवीनंतर नेट / सेट देऊन प्राध्यापक पदासाठी पात्र ठरू शकता. बीए केल्यावर एलएलबी करता येऊ शकते. केंद्र लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेमध्ये मुख्य परीक्षेसाठी राज्यशास्त्राचा पर्याय निवडता येतो. पदवी-पदव्युत्तर पदवी स्तरापर्यंतचा सविस्तर अभ्यास झाल्याने या प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तम गुण मिळू शकतात. राजकीय व्यवस्था आणि विविध प्रणालींची इत्थंभूत माहिती मिळाल्याने राजकीय क्षेत्रात करिअर करता येऊ शकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी आयआयटी रुरुकीमधून सिव्हिल इजिंनीअिरगमध्ये बीटेक् केले आहे. सध्या मी वित्तीय ब्रोकरेज कंपनीत विश्लेषक म्हणून काम करतो. मला पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करायचा आहे.  शाळेत असल्यापासून अॅस्ट्रोफिजिक्स विषयाची आवड असल्याने त्यामध्ये पीएचडी करावे असे वाटते. पण गेल्या काही दिवसांपासून मला वित्तीय क्षेत्रात रस वाटू लागला आहे. या क्षेत्रातील संधी आणि प्रगती याबद्दल माहिती आहे. अशा स्थितीत एमबीए (वित्त) करणे उचित ठरेल की अॅस्ट्रोफिजिक्समध्ये पीएचडी?
  – चिन्मय हजारे
तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुमच्या प्रश्नातच दडलेले आहे. एकीकडे ज्ञात रस्ता आहे. दुसरीकडे अज्ञात मार्ग आहे. ज्ञात रस्त्याने गेल्यास धोके कमी असतात. पण यातून समाधान, आनंद कितपत मिळेल हे मोजता येणे कठीण. अज्ञात रस्त्याने जाणे म्हणजे आव्हानांचा स्वीकार करणे. कोणतेही आव्हान हे आपल्या क्षमतांची कसोटी पाहणारे असते. त्यात यशस्वी ठरण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची गरज असते.
तुम्ही बी.टेक.नंतर सिव्हिल इंजिनीअिरग वा तत्सम विषयांमध्ये एम.टेक. न करता तुमच्यापुढे चालून आलेली वित्तीय क्षेत्रातील संधी तुम्ही स्वीकारलीत. याचा अर्थ करिअरबद्दल संकल्पना स्पष्ट आहेत. शिवाय आता तुम्हाला या क्षेत्रात रस निर्माण झाला आहे. या क्षेत्रातील पुढील प्रगतीच्या वाटा कोणत्या आहेत याचीही कल्पना आहे. त्यामुळे आता पुन्हा नव्या क्षेत्रात उडी मारण्याऐवजी एमबीए (वित्त) करणेच योग्य ठरेल. सारे जग अर्थकारणाभोवती फिरत असल्याने या करिअरमध्ये तुम्हाला हव्या त्या उंचीपर्यंत पोहोचता येऊ शकते.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Careermantra
First published on: 25-08-2014 at 01:05 IST