आजच्या लेखात आपण भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence) या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत. यूपीएससीने दिलेल्या मुख्य परीक्षेतील चौथ्या पेपरमधील हा एक महत्त्वाचा घटक आहे. आपण अनेकदा सभोवताली अशा व्यक्ती बघतो ज्या अतिशय ‘बुद्धिमान’ व ‘हुशार’ असतात, मात्र आयुष्यातील साधी आव्हाने स्वीकारणे त्यांना अतिशय अवघड जाते. अनेकदा ‘बुद्धिमत्ता’ परीक्षेमध्ये गुण मिळवून देऊ शकत नाही अथवा कामाच्या ठिकाणी पुरेशी ‘बुद्धिमत्ता’ असूनही फारशी प्रगती साधता येत नाही. या आणि अशा अनेक वेगवेगळ्या घटनांमधून आपणास हे पाहता येते की, ‘बुद्धिमान’ व्यक्ती ही ‘यशस्वी’ व्यक्ती असतेच असे नाही. किंबहुना त्यांच्या अपयशाचे गमक हे त्यांच्या बुद्धिमत्तेच्या असण्याशी किंवा नसण्याशी जोडलेले नसून वेगळ्याच घटकांशी संबंधित असते. भावनिक बुद्धिप्रामाण्याच्या अभ्यासाचे मूळ आपल्याला डार्वनिच्या सद्धांतिक कामामध्ये आढळून येते. डार्वनिने हे सर्वात प्रथम मांडले की, भावनिकरीत्या व्यक्त होता येणे हे तग धरून ठेवण्यासाठी (Survival)आवश्यक असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर शास्त्रज्ञांना हे लक्षात आले आहे की, केवळ बुद्धिमत्ता तपासून बघणे (जी बुद्धिमत्ता चाचण्या/बुद्धय़ांक –  Intelligence test/Intelligence quotient यामधून तपासली जाऊ शकते.) यामधूनच एखाद्या व्यक्तीच्या क्षमतांची पूर्ण पारख होऊ शकत नाही. सर्वसामान्यत: ‘बुद्धिमत्ता’ या शब्दामधून ज्या प्रकारच्या क्षमतांची अपेक्षा केली जाते त्यापलीकडे जाऊन मानवी भावनांवर आधारित बुद्धिमापनाची नवीन प्रणाली विकसित करण्यात आली. भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence) हा तुलनेने नवीन असा संशोधनाचा व अभ्यासाचा विषय आहे. परंतु चौकटीत म्हटल्याप्रमाणे या विचाराचे बीज आपल्याला डार्वनिच्या संशोधनातदेखील दिसून येते. भावनिक बुद्धय़ांक (Emotional Quotient) जास्त असणाऱ्या व्यक्ती कामाच्या ठिकाणी अधिक यशस्वी होतात, असे अनेक पाहणीअंती सिद्ध झाले आहे.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Emotional intelligence upsc exam
First published on: 25-01-2018 at 01:05 IST