भारत डायनॅमिक्स लि.मध्ये खेळाडूंसाठी १६ जागा-

वयोमर्यादा २५ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १ ते ७ एप्रिल २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली भारत डायनॅमिक, हैद्राबादची जाहिरात पहावी अथवा कंपनीच्या http://bdl-india.com/  या संकेतस्थळावरील  careers> Recruitment> Advt. No. 2017 1 Recruitment of sportpersons  हा विभाग पाहावा. संपूर्णपणे भरलेले अर्ज असिस्टंट जनरल मॅनेजर (एचआरडी), भारत डायनॅमिक्स लि., काचनबाग, हैद्राबाद ५०००५८ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २१ एप्रिल २०१७. आघारकर संशोधन संस्था, पुणे येथे बायो एनर्जी क्षेत्रात तांत्रिक अधिकारी म्हणून संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २५ ते ३१ मार्च २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली आघारकर संशोधन संस्था, पुणेची जाहिरात पहावी अथवा संस्थेच्या http://www.aripune.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमून्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज संचालक, आघारकर संशोधन संस्था, गोपाळ गणेश आगरकर मार्ग, पुणे- ४११००४ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २१ एप्रिल २०१७.

संरक्षण मंत्रालयांतर्गत रुडकी येथे स्टोअरकीपरच्या ६ जागा-

अर्जदार बारावी उत्तीर्ण व स्टोर्स मॅनेजमेंट वा स्टोअरकीपिंगमधील पात्रताधारक असावेत. संगणकाचे ज्ञान व संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमूना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २५ ते ३१ मार्च २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली संरक्षण मंत्रालय रुडकीची जाहिरात पहावी. विहित नमून्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, हेडक्वार्टर्स- बीईजी अ‍ॅण्ड सेंटर, रुडकी- २४७६६७ (जि. हरिद्वार), उत्तराखंड या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २२ एप्रिल २०१७.

इंडियन इंस्टीटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई येथे डेप्युटी रजिस्ट्रार म्हणून संधी-

अर्जदार पदव्युत्तर पात्रताधारक असावेत. अधिक माहिती व तपशीलासाठी इंडियन इंस्टीटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबईच्या http://www.iitb.ac.in/en/careers/staff-recruitment या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ एप्रिल २०१७.

इंडियन इंस्टीटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई येथे टेक्नीकल सुपरिटेंडेंटच्या २ जागा-

अर्जदार बीई/ बीटेक अथवा संगणक  विषयातील एमएस्सी असावेत व त्यांना एक वर्षांचा वा अभियांत्रिकी विषयातील पदविकाधारक असल्यास सहा वर्षांचा अनुभव असायला हवा. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १ ते ७ एप्रिल २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली इंडियन इंस्टीटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीची जाहिरात पहावी अथवा इंस्टीटय़ूटच्या http://www.iitb.ac.in/ eu/ careers/ staff- recruitment या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ एप्रिल २०१७.

डीआरडीओ अंतर्गत इंटिग्रेटेड टेस्ट रेंज, बालासोर येथे तांत्रिक पदविका प्रशिक्षार्थीच्या ४० जागा-

अर्जदार बारावी उत्तीर्ण असावेत व त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स वा संगणक विज्ञान यासारख्या विषयातील पदविका उत्तीर्ण केलेली असावी. अर्जाचा नमूना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २५ ते ३१ मार्च २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली डीआरडीओ- इंटिग्रेटेड टेस्ट रेंजची जाहिरात पहावी. विहित नमून्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर, इंटिग्रेटेड टेस्ट रेंज (आयटीआर), चांदीपूर, बालासोर ७५६०२५  या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २२ एप्रिल २०१७.

संरक्षण मंत्रालयांतर्गत ग्रेनडिअर्स रेकॉर्ड विभाग, जबलपूर येथे कनिष्ठ कारकुनांच्या ७ जागा-

अर्जदार बारावी उत्तीर्ण असावेत. त्यांनी इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनिट तर हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट पात्रता पूर्ण केलेली असावी. संगणकाचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमूना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २५ ते ३१ मार्च २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली ग्रेनडिअर्स रेकॉर्डस् जबलपूरची जाहिरात पहावी. विहित नमून्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज दि कमांडिंग ऑफिसर, दि ग्रेनडिअर्स रेकॉर्डस्, जबलपूर (मप्र) ४८२००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २४ एप्रिल २०१६.

ऑल इंडिया इंस्टीटय़ूट ऑफ फिजिकल मेडिसीन अ‍ॅण्ड रिहॅबिलिटेशन, मुंबई येथे व्यवसाय मार्गदर्शन विषयक व्याख्यात्यांच्या २ जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २५ फेब्रुवारी ते ३ मार्च २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली ऑल इंडिया इंस्टीटय़ूट ऑफ फिजिकल मेडिसीन अ‍ॅण्ड रिहॅबिलिटेशनची जाहिरात पहावी अथवा इंस्टीटय़ूटच्या http://aiipmr.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर, ऑल इंडिया इंस्टीटय़ूट ऑफ फिजिकल मेडिसीन अ‍ॅण्ड रिहॅबिलिटेशन, मुंबई- ४०००३४ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २४ एप्रिल २०१७.