योग्य बाजारपेठेअभावी किंवा प्रक्रिया न केल्यामुळे शेतमालाचे, विशेषत: भाजीपाल्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. भाजीपाला निर्जलीकरण हा यावर एक उत्तम पर्याय आहे. मात्र या संकल्पनेतून शेतकरी आपला सर्व शेतमाल विकू शकतो. बाजार समितीतील पद्धती, मध्यस्थांचे कमिशन व उच्चांकी आवक यांमुळे शेतमालाचे दर पडतात. या सर्व पाश्र्वभूमीवर ‘थेट घरपोच भाजीपाला पुरवठा’ ही संकल्पना काहीशा प्रमाणात नियंत्रण आणू शकते. यासाठी शेतकऱ्यांनी खालील गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • उत्तम दर्जाचे कृषिमाल उत्पादन
  • अत्याधुनिक लागवड ते कृषिमाल विपणन
  • ग्राहक वर्गाच्या पसंतीचा अभ्यास
  • कीटकनाशकांचा कमीत कमी वापर
  • सेंद्रिय शेतीचा अवलंब,
  • दर्जात्मक मालाची निवड
  • आकर्षक पॅकेजिंग
  • दैनंदिन व वेळेत भाजीपाला पुरवठा
  • साप्ताहिक अथवा मासिक ग्राहक अभिप्राय व
  • मोबाइल, सोशल नेटवर्किंग साइट्सचा प्रभावी वापर

भाजीपाल्याच्या मार्केटिंगसाठी पुणे-मुंबई यांसारखी मोठी शहरे शेतकरी वर्गाला खुणावत आहेत. ही मोठी संधी ओळखून यात उतरले पाहिजे. तसेच ‘नंबर फिरवा आणि भाजी मिळवा’ उपक्रमसुद्धा तुम्ही राबवू शकता. यात शेतकरी भाजीपाला तसेच इतरही कृषिमाल उदा. धान्य, डाळी, फळे व इतर कृषिमाल विकून चांगले अर्थार्जन करू शकतो. काढणीपश्चात तंत्रज्ञानाच्या अभावामुळे सर्वच देशांत कृषी क्षेत्रात बऱ्याच प्रमाणात नुकसान होताना दिसते. या समस्येवर कृषिमाल प्रक्रिया हा उत्तम पर्याय आहे. इस्राइल तथा स्वित्र्झलडमध्ये ५० टक्के शेतीमालावर प्रक्रिया केली जाते. भारतात शेतीमालाची मुबलक उपलब्धता आहे; मात्र योग्य व्यवस्थापन व कौशल्याअभावी त्यावर प्रक्रिया होत नाही. योग्य व्यवस्थापनाला ज्ञानाची जोड दिली, तर भाजीपाला निर्जलीकरण, दुग्धप्रक्रिया आदी उद्योग शेतकरी उभारू शकतात. शेतीवरील उत्पादनाला योग्य किंमत हवी असेल, तर शेतकऱ्यांनी शेतीमाल प्रक्रियेकडे वळावे.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home delivery of vegetable
First published on: 19-01-2017 at 00:30 IST