आजच्या लेखामध्ये आपण भारतीय कला आणि संस्कृती या घटकाची पूर्व परीक्षेसाठी तयारी कशी करावी याची चर्चा करणार आहोत. २०११ ते २०१७ मध्ये या घटकावर एकूण ३७ प्रश्न विचारण्यात आले आहेत. हा घटक परीक्षेचा विचार करता अधिकच महत्त्वपूर्ण होत चाललेला आहे. कारण या विषयाची तयारी फक्त पूर्व परीक्षेसाठी मर्यादित नसून मुख्य परीक्षेलाही करावी लागते, त्यामुळे या विषयाची सर्वंकष तयारी करणे गरजेचे आहे.

स्वरूप व अभ्यासाचे नियोजन 

shoe sizing system in india
भारतात येणार नवीन ‘शू सायझिंग सिस्टिम’, ‘भा’ म्हणजे काय आणि त्याची गरज का आहे?
Indian advertising, Diversity,
भारतीय जाहिरातींतील विविधता हरवली! ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाचा अहवाल काय सांगतो…
Loksatta editorial Today marks the 40th anniversary of India successful Siachen Digvijaya campaign Operation Meghdoot
अग्रलेख: सियाचीनचा सांगावा..
Miller Mathew
‘No Comments’ : भारत पाकिस्तानात घुसून दहशतवादी मारतं का? अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्त म्हणाले…

या घटकाची तयारी करताना प्राचीन भारतातील कला आणि संस्कृतीपासून सुरुवात करावी लागते, ज्यामुळे भारतात अस्तित्वात असणाऱ्या विविध कला आणि संस्कृतीचा उगम कसा झालेला आहे याची ऐतिहासिक पाश्र्वभूमी आपल्याला लक्षात घ्यावी लागते. स्थापत्यकला व शिल्पकला, भारतीय संगीत, नाटय़ व नृत्य, चित्रकला, साहित्य आणि भारतीय तत्त्वज्ञान या घटकाविषयी अधिक सखोल आणि सर्वागीण माहिती अभ्यासणे गरजेचे आहे. प्राचीन भारतातील सिंधू संस्कृती, बौद्धयुग अथवा महाजनपदाचा कालखंड, मौर्य कालखंड, मौर्योत्तर कालखंड, गुप्त कालखंड आणि गुप्तोत्तर कालखंड अशा प्रकारे कालखंडनिहाय वर्गीकरण करावे. त्या कालखंडातील स्थापत्यकला, शिल्पकला, चित्रकला, साहित्य आणि तत्त्वज्ञान यांच्याशी संबंधित विविध संकल्पना, कलेचे प्रकार आणि वैशिष्टय़ तसेच याच्याशी निगडित ऐतिहासिक स्थळे व नेमकी ही स्थळे कोणत्या कालखंडात निर्माण करण्यात आलेली होती, याचबरोबर ही स्थळे कोणत्या धर्माची होती आणि कोणी निर्माण केली होती इत्यादी पलूविषयी मूलभूत माहितीचा अभ्यास सर्वप्रथम करावा लागतो, ज्यामुळे या विषयाची परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारी तयारी आपणाला करता येते.

मध्ययुगीन भारतातील कला व संस्कृतीचा अभ्यास करताना उपरोक्त पद्धतीनेच करावा कारण प्राचीन भारतातील विविध कलांचे परिपक्व स्वरूप आपणाला या कालखंडात पाहावयास मिळते, उदाहरणार्थ स्थापत्यकला, चित्रकला आणि  साहित्य याचबरोबर आपणाला या कालखंडात बौद्ध, जैन आणि हिंदू धर्माव्यतिरिक्त इस्लाम धर्माशी संबंधित इंडो-इस्लामिक स्थापत्यकलेचा उदय झालेला पाहावयास मिळतो. तसेच चित्रकलेमध्ये भित्ती चित्रकलासोबतच लघू चित्रकलेचा उदय झालेला दिसून येतो व याच्या जोडीला आपणाला धर्मनिरपेक्ष साहित्य, स्थापत्यकला आणि प्राचीन व मध्ययुगीन कालखंडातील विज्ञान आणि तंत्रज्ञान याविषयी संबंधित माहिती असणे गरजेचे आहे.

गतवर्षीय परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न व त्यांचे स्वरूप

* २०११मध्ये, जैन तत्त्वज्ञानानुसार जगाची निर्मिती व संचालन कशामार्फत होते व यासाठी वैश्विक कायदा, वैश्विक सत्य, वैश्विक श्रद्धा आणि वैश्विक आत्मा हे चार पर्याय दिलेले होते.

* २०१२ च्या परीक्षेत, भूमीस्पर्श मुद्रा या हस्तमुद्रेतील भगवान बुद्धाची प्रतिमा काय दर्शिविते?  हा प्रश्न विचारण्यात आलेला होता.

* २०१३ मध्ये, बौद्ध धर्माशी संबंधित शैलशिल्प लेणी चत्य आणि इतर विहारे असे संबोधले जातात, या दोन्हीमध्ये काय फरक आहे, हे विचारले होते.

* २०१४ मध्ये, भारताच्या सांस्कृतिक इतिहासासंदर्भात पंचयतन संज्ञा कशाशी संबंधित आहे? याचवर्षी भारताच्या संस्कृती आणि परंपरांसंदर्भात कालारीपायात्तू (Kalaripayattu) काय आहे, असा प्रश्न विचारण्यात आलेला होता.

* २०१५ मध्ये, कलमकारी चित्रकला काय निर्देशित करते? असा प्रश्न विचारलेला होता आणि याच वर्षी अलीकडेच खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यात आलेला आहे? हा प्रश्न विचारण्यात आलेला होता.

* २०१६ मध्ये बोधिसत्व या संकल्पनेशी संबंधित प्रश्न विचारला गेलेला होता.

* २०१७ मध्ये जैन धर्म, चित्रकला, भारतातील विविध जमातींद्वारे साजरे केले जाणारे उत्सव, सण, तसेच सूर्य मंदिरे यासाठी प्रसिद्ध असणारी ठिकाणे यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

याव्यतिरिक्त भारतीय षड्दर्शने, त्रिभंगा आणि सत्तारीया नृत्य, मूर्तीशिल्प, मंदिर शैली, अभिजात भाषा यावरही प्रश्न विचारण्यात आले होते. या विषयावर आलेल्या प्रश्नांचे योग्य आकलन केल्यास असे दिसून येते की प्रश्नाचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ आणि विश्लेषणात्मक या दोन्ही प्रकारांत मोडणारे आहे, त्यामुळे या विषयाचा अभ्यास या घटकाच्या मूलभूत माहितीसह विश्लेषणात्मक बाजू विचारात घेऊन करावा लागतो. बहुतांश प्रश्न हे संकल्पनांवर आधारित विचारण्यात आलेले असल्यामुळे या घटकाशी संबंधित संकल्पना, त्यांचा अर्थ, उगम व वैशिष्टय़ इत्यादीची माहिती असणे गरजेचे आहे.

या घटकाची मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकाचा आधार घ्यावा लागतो. इयत्ता ११वीचे  An Introduction to Indian Art Part – I  हे पुस्तक सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे. तसेच याच्या जोडीला १२ वीचे  Themes in Indian History part- I and कक  व जुन्या एनसीईआरटीचे प्राचीन आणि मध्ययुगीन भारतावरील पुस्तकातील भारतीय कला आणि संस्कृती संबंधित कालखंडनिहाय अभ्यास करावा. स्वत:च्या नोट्स तयार कराव्यात, जेणेकरून कमीत कमी वेळेमध्ये या विषयाची तयारी आपण करू शकू. या पुढील लेखामध्ये आपण आधुनिक भारत या घटकाचा आढावा घेणार आहोत.