आजच्या लेखामध्ये आपण आधुनिक भारताअंतर्गत येणाऱ्या ‘भारतीय स्वातंत्र्य चळवळ’ या विषयाची पूर्वपरीक्षेसाठी तयारी कशी करावी, याची चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम या विषयाची आपण थोडक्यात उकल करून घेऊ या. यामध्ये प्रामुख्याने भारतीय राष्ट्रवाद आणि याच्या उदयाची कारणे, विविध प्रादेशिक राजकीय संघटना, १८८५ मधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आणि येथून पुढे स्वातंत्र्यप्राप्तीसाठी संघटित पद्धतीने सुरू झालेला लढा, राष्ट्रीय चळवळीची सर्वसाधारणपणे तीन टप्प्यांत विभागणी केली जाते. मवाळ  कालखंड, (१८८५-१९०५), जहालवादी कालखंड (१९०५-१९१९) आणि गांधी युग (१९२०-१९४७) तसेच याला समांतर असणारे भारतीय स्वातंत्र्य चळवळीमधील इतर प्रवाह ज्यामध्ये कामगार चळवळ, क्रांतिकारी चळवळ, इत्यादीचा समावेश होतो. याचबरोबर स्वराज पार्टी, आझाद िहद सेना, भारतीय स्वातंत्र्य चळवळीमधील महिलांचे योगदान, भारतीय सांप्रदायिकतेचा उदय, मुस्लीम लीग, िहदू महासभा, भारतीय संस्थाने व संस्थानमधील प्रजेच्या चळवळी, खालच्या जातीतील चळवळी, आधुनिक भारताच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण व्यक्ती तसेच गव्हर्नर जनरल (व्हाईसरॉय) आणि भारतमंत्री, १८५७ च्या नंतरचे ब्रिटिश संसदेने पारित केलेले कायदे- १८५८, १८६१, १८९१, १९०९, १९१९, १९३५ व १९४७ ज्यांना आपण ब्रिटिशकालीन भारतातील घटनात्मक विकास म्हणून पाहतो तसेच सायमन कमिशन, गोलमेज परिषद, ऑगस्ट ऑफर, क्रिप्स मिशन, वावेल प्लॅन, कॅबिनेट मिशन इत्यादीशी संबंधित मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे. हा विषय आपणाला पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टीने तयार करावा लागत असल्यामुळे या विषयाची सखोल आणि व्यापक पलूंचा विचार करून तयारी करावी लागते. कारण या विषयावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप पाहता हा विषय सर्वागीण पद्धतीने अभ्यासणे गरजेचे आहे, जे खालील गतवर्षीय परीक्षांमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्न विश्लेषणावरून समजून येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या विषयावर २०११ ते २०१६ मध्ये एकूण ३३ प्रश्न विचारण्यात आलेले होते. आत्ता आपण या विषयावर गतवर्षीय परीक्षांमध्ये विचारण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची विश्लेषणात्मक पद्धतीने थोडक्यात चर्चा करणार आहोत, ज्यामुळे या विषयाची परीक्षाभिमुख तयारी आणि नियोजन आपणाला अधिक उपयुक्त पद्धतीने करण्यास मदत होईल.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian freedom struggle
First published on: 23-03-2017 at 00:28 IST