शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एससीआय)मध्ये ५० इलेक्ट्रिकल ऑफिसरपदांची भरती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पात्रता – बी.ई. (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स). किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण (अजा/अजसाठी ५०% गुण). डीजी अप्रूव्हड ४ महिन्यांचा इलेक्ट्रो टेक्नो ऑफिसर (ईटीओ) कोर्स सर्टििफकेट नसलेले उमेदवारसुद्धा अर्ज करू शकतात.

परीक्षा केंद्र – मुंबई, दिल्ली, चेन्नई, कलकत्ता.

फी – रु. १,०००/- (अजा/अज – रु. ५००/-). ऑनलाइन अर्ज  http://www.shipindia.com>career>fleetpersonnelvicepresident (एफपीई) या संकेतस्थळावर २५ जून २०१७ पर्यंत करावेत. ऑनलाइन टेस्ट १ जुल २०१७ रोजी ११.०० वाजता होईल.

पोलीस आयुक्त, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विधि अधिकारीच्या एकूण ४९ पदांची ११ महिने कंत्राटी पद्धतीने भरती.

पात्रता – कायद्याचा पदवीधर. सनदधारक असावा.  किमान ५ वर्षांचा वकिली व्यवसायाचा अनुभव असावा.

वयोमर्यादा – ३० एप्रिल २०१७ रोजी ६० वर्षांपेक्षा जास्त नसावे. करारातील मासिक देय रक्कम रु. १५,०००/-. उमेदवारांनी प्रत्येक आठवडय़ात किमान ३० तास काम करणे आवश्यक. विहित नमुन्यातील अर्ज क्रॉफर्ड मार्केटसमोर, मुंबई – ४०० ००१ (लक्षवेध साहाय्यक पोलीस आयुक्त, प्रशासन मुंबई) या पत्त्यावर पोहोचतील असे पाठवावेत.

हायकोर्ट ऑफ गुजरात – एकूण १२९ सिव्हिल जजेसची भरती

(रेग्युलर पदे – ९७, अ‍ॅडहॉक पदे – ३२).

पात्रता – कायदा पदवीधर.  सनदधारक. वकिली व्यवसायाचा अनुभव.

वयोमर्यादा – ३५ वष्रे (मागास – ३८ वष्रे).

अर्जाचे शुल्क – रु. ८००/-

(अजा/अज – रु.४००/-).

पूर्वपरीक्षा – १३ ऑगस्ट २०१७.

मुख्य परीक्षा – १० सप्टेंबर २०१७

मुलाखत.

ऑनलाइन अर्ज www.gujrathighcourt.nic.in वर दि. २२ जून २०१७ पर्यंत करावेत.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job opportunities in shipping corporation
First published on: 08-06-2017 at 00:29 IST