मागील अंकात आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षेची ओळख करून घेतली. आजच्या अंकात आपण महाराष्ट्र कृषी सेवा (मुख्य) परीक्षेची माहिती करून घेऊ या आणि त्यायोगे मुख्य परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणि अभ्यासाचे नियोजन कसे करता येईल ते पाहू.

ugc net exam marathi news, ugc net exam online application form marathi news
‘युजीसी नेट’ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया जाहीर, कधी होणार परीक्षा?
ugc new decision direct admission to phd after graduation
आता पदवीनंतर पीएच.डी.ला मिळणार थेट प्रवेश! काय आहे युजीसीचा नवा निर्णय? युजीसीचे अध्यक्ष प्रा. एम. जगदेशकुमार यांची माहिती 
gadchiroli marathi news, gadchiroli upsc marathi news
गडचिरोलीत स्वत:हून ‘पोस्टिंग’ घेणाऱ्या बीडीओची ‘युपीएससीत’ही भरारी…..
CUET PG exam result announced by NTA pune
‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेचा निकाल ‘एनटीए’कडून जाहीर, यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?

cv1chart1

  • कृषी विज्ञान हा विषय अनिवार्य असून परिक्षार्थीला कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी यापकी एका विषयाची वैकल्पिक विषय म्हणून निवड करता येते.
  • मुख्य परीक्षेच्या दोन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका (अनिवार्य आणि वैकल्पिक) फक्त इंग्रजी माध्यमातच असतात.

मुख्य परीक्षा अभ्यासक्रम –

  • अभ्यासक्रमातील प्रमुख घटक येथे देत आहे. संपूर्ण अभ्यासक्रमासाठी आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

पेपर १ (अनिवार्य) कृषी विज्ञान (अ‍ॅग्रिकल्चर सायन्स)

अ‍ॅग्रोनॉमी अ‍ॅग्रोनॉमीची तत्वे –

  • अ‍ॅग्रोनॉमी – व्याख्या व्याप्ती आणि कृषी शास्त्रज्ञांची भूमिका.
  • पिकांचे वर्गीकरण – भारत आणि महाराष्ट्रातील कृषी हंगाम
  • मशागत (टिलेज) – मशागतीचे जमीन व पिकांच्या वाढीवरील परिणाम.
  • बियाणे
  • पेरणी प्रणाली
  • तृण

कृषी हवामानशास्त्र –

कृषी हवामानशास्त्र व्याख्या, तापमान मापन, सौर किरणे, वातावरणीय दबाव, हायड्रॉलॉजिकल सायकल.

जलसिंचन पाणी व्यवस्थापन –

  • पाण्याचे स्रोत, आद्र्रता, बाष्पीभवन.
  • सिंचन
  • ड्रेनेज

फिल्ड क्रॉप्स –

अ) खरीप पिके –

ब) फिल्ड पिके

  • पर्जन्य आधारित शेती – महाराष्ट्रातील अ‍ॅग्रोक्लायमॅटिक झोन.
  • शेती प्रणाली आणि शाश्वत शेती – माती विज्ञान (सॉइल सायन्स)

मातीचे प्राकृतिक आणि रासायनिक गुणधर्म, रचना, प्रकार आणि पीक उत्पादनात मातीचे महत्त्व.

कृषी अभियांत्रिकी

  • शेती अवजारे आणि कार्यक्षमता –

अ) शेतीतील कार्यशक्तीचे घटक

ब) मशागत (टिलेज)

क) बियाणे पेरण्याचे तंत्र

ड) पिकांची संरक्षण करणारी उपकरणे

  • कृषिप्रक्रिया अभियांत्रिकी –

अ) साठवणुकीदरम्यान अन्नधान्यात होणारे बदल

ब) डिटर्मिनेशन ऑफ मॉइश्चर कन्टेन्ट

क) कार्यरत तत्वे

ड) मटेरियल हॅन्डिलग इक्युपमेंट्स

  • माती आणि पाणी संवर्धन, पाणलोट व्यवस्थापन

अ) मृदा व पाण्याच्या संवर्धनासाठी महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या पद्धती.

ब) इरोजन

क) पाणलोट व्यवस्थापन तत्त्वे

  • सूक्ष्म सिंचन आणि ड्रेनेज अभियांत्रिकी
  • फार्म स्ट्रक्चर

cv1chart2

२) २०१६च्या मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रमातील गुणांच्या विभागणीवरून असे दिसून येते की, आयोगाने कृषी अभियांत्रिकी व अ‍ॅग्रोनॉमी या घटकांना २/३ पेक्षा जास्त वेटेज दिले आहे. दोन्ही घटकांवर अनुक्रमे ४० प्रश्न ८० गुणांसाठी विचारले आहेत. त्यामुळे कृषी विज्ञानाचा अभ्यास करताना अ‍ॅग्रोनॉमी व कृषी अभियांत्रिकी या घटकांना प्राधान्यक्रम देणे गरजेचे आहे.

अ‍ॅग्रोनॉमी या घटकात हवामानशास्त्रीय घटकांचे जसे की उष्णता, जमिनीतील आद्र्रता, हवा यांचा पिकांवरील परिणाम, मशागतीवर परिणाम करणारे घटक, भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD), जागतिक हवामानशास्त्र संस्था (WMO), मशागत पद्धती, पिकांनुसार पाण्याची आवश्यकता, शाश्वत शेती, जलसिंचनाच्या पद्धती व पाणी व्यवस्थापन पद्धती, सेंद्रिय शेती, सौर किरणे, महाराष्ट्रातील कृषी हंगाम, तृणधान्ये, डाळी, व्यावसायिक पिके या उपघटकांवर प्रश्न विचारले आहेत.  माती विज्ञान आणि कृषी अभियांत्रिकी या घटकांत जमिनीचे रासायनिक गुणधर्म, जमिनीचा कस, सेंद्रिय खते, पोषक द्रव्ये, शेती संसाधने, धान्य साठवणुकीस आवश्यक वातावरण, इक्विपमेंट्स हॅन्डिलग, सूक्ष्मसिंचन, ग्रीन हाऊस तंत्रज्ञान, शेती यांत्रिकी या घटकांवर आयोगाने भर दिला आहे. त्यामुळे अभ्यास करताना संबंधित उपघटकांवर परीक्षार्थीनी लक्ष द्यावे.

संदर्भ सूची –

  • प्रिन्सिपल ऑफ अ‍ॅग्रोनॉमी – रेड्डी
  • राज्य परीक्षा मंडळाची अ‍ॅग्रिकल्चर आणि टेक्नॉलॉजीची ११ वी व १२ वीची पुस्तके
  • पर्यावरण – शंकर आयएएस अ‍ॅकॅडमी
  • टॉपर्स नोटस् – सुभाष यादव, सचिन सूर्यवंशी
  • जनरल अ‍ॅग्रिकल्चर – मुनीरजी
  • अ कॉम्पेटिटिव्ह बुक ऑफ अ‍ॅग्री- नेमराज सुंदा
  • ईगल पब्लिकेशन बुक – नागरे