विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या लेखांत आपण साहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि पोलीस उप निरीक्षक या तीनही परीक्षांसाठी समान असणाऱ्या घटकांपकी मराठी व इंग्रजी या विषयांच्या अभ्यासाची रणनीती पाहिली. आज आपण चालू घडामोडी, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास या विषयांच्या अभ्यासाची रणनीती पाहू या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण -सामान्य अध्ययन या विषयाची तयारी करताना विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम २०१३ सालापासून अर्थात परीक्षेचे स्वरूप बदललेल्या सालापासून आत्तापर्यंत साहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि पोलीस उप निरीक्षक या पदांसाठी झालेल्या सर्व मुख्य परीक्षांच्या प्रश्नपत्रिका समोर ठेवाव्या. यानंतर त्यात अभ्यासक्रमाच्या कोणत्या भागावर किती आणि कशा स्वरूपाचे प्रश्न आले आहेत ते टिपून ठेवले पाहिजे. या सर्वच प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास विद्यार्थ्यांना आयोगाच्या अपेक्षा समजून घेणे सुकर होऊ शकते. या प्रकारचे विश्लेषण केल्यानंतर आपल्याला अभ्यासक्रमातील कोणत्या घटकावर अधिक भर द्यायचा आणि कोणत्या घटकावर कमी भर द्यायचा याचा अंदाज येऊ शकतो. जेणेकरून आपली अभ्यासाची रणनीती निश्चित करता येते. या टप्प्यावर जुन्या प्रश्नपत्रिकांतील प्रश्न व उत्तरांचे वाचन करून त्यातील प्रश्नांना अभ्यासक्रमामधील उपघटकांशी जोडण्याचा प्रयत्न करावा, ज्यामुळे कोणत्या घटकावर अधिक प्रश्न विचारले जातात हे उमगते. योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी त्याचा निश्चितच फायदा होतो. त्याचबरोबर प्रश्नांच्या स्वरूपाचीही माहिती मिळते.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra history geography and current affairs
First published on: 13-10-2017 at 00:25 IST