कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्ड अत्यंत आवश्यक आहे. तसेच फोटो, ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा यासाठी पॅनकार्ड गरजेचे असते. तुम्हाला स्वत: जाऊन पॅनकार्ड काढणे शक्य नसल्यास पॅनकार्ड ऑनलाइनही काढता येते. त्यासाठी पॅनकार्डसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • सर्वप्रथम -प्रथम https://india.gov.in/apply-online-new-pan-card िया संकेतस्थळावर जावे. तिथे पॅनकार्डसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्याच्या लिंकवर क्लिक करावे.
  • याच संकेतस्थळावरून पॅनकार्डसाठीचा अर्ज डाउनलोड करून घ्यावा.
  • या अर्जात विचारल्याप्रमाणे दिलेली माहिती भरावी.
  • माहिती भरल्यानंतर तुम्हाला पॅनकार्ड काढण्यासाठी काही रक्कम भरावी लागेल. ही रक्कम क्रेडिट, डेबिट कार्ड अथवा इंटरनेट बँकिंगद्वारे तुम्हाला भरावी लागेल.
  • अर्ज भरल्यानंतर तुम्हाला हा अर्ज पाठविण्यासाठीचा पत्ता, आवश्यक असणारी कागदपत्रे, पासपोर्ट आकाराचा फोटो याबाबतची माहिती असणारे पत्र देण्यात येईल.
  • तुम्ही ही कागदपत्रे पाठविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाकिटावर विषयामध्ये पॅनकार्डसाठी अर्ज आणि तुम्हाला मिळालेल्या माहितीपत्रावरील क्रमांक टाकावा.
  • पुढील पंधरा दिवसांत तुम्हाला तुमचे पॅनकार्ड मिळेल. ते न मिळाल्यास तुम्ही https://tin.tin.nsdl.com/tan/servlet/PanStatusTrack या संकेतस्थळाला भेट देऊ शकता व पुढील माहिती मिळवू शकता.
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online pan card application process
First published on: 20-10-2016 at 00:30 IST