या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र पोलीस दलाने पोलीस व नागरिक समन्वयासाठी जवळचे पोलीस स्टेशन व पोलीस दलाच्या सर्व हेल्पलाइन क्रमांकाची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी ‘पोलीस मित्र महाराष्ट्र’ हे अ‍ॅप महाराष्ट्रातील नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन हे अ‍ॅप डाऊनलोड करता येते.

  • नागरिकांनी हे अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर स्वत:ची संपूर्ण माहिती भरावी .
  • रजिस्टर झाल्यानंतर पोलीस मदत मिळवा तसेच पोलीस मित्र म्हणून नोंदणी करा व ‘रिपोर्ट इनसिडेंट’ हे पर्याय स्क्रीनवर दिसू लागतात.
  • पोलीस मदत मिळवा, हे बटण दाबल्यानंतर नागरिकांना स्क्रीनवर जवळचे पोलीस स्टेशन, अंतर व जाण्याचा मार्ग दिसतो.
  • सर्व हेल्पलाइन क्रमांकावर थेट संभाषण करता येते किंवा कोणतीही अनुचित घटना घडत असेल तर त्याचा फोटो किंवा व्हिडीओ रेकॉर्डिग संबंधित पोलीस स्टेशनला थेट पाठविण्याची व्यवस्था केली आहे.
  • रजिस्टर झालेल्या नागरिकांपैकी ज्यांना पोलीस मित्र म्हणून काम करायचे आहे, ते ऑनलाइन फॉर्म भरून पोलीस मित्र बनू शकतात.
  • त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात पोलिसांना मदत करू शकतात.
  • पोलीस मित्र अ‍ॅपद्वारे नागरिक पोलिसांशी जोडले गेल्याने पोलिसांना त्याची मोठी मदत मिळत आहे.
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police mitra maharashtra app
First published on: 21-01-2017 at 00:27 IST