महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालय, पुणे तर्फे पंतप्रधानांच्या १५ कलमी कार्यक्रमांतर्गत अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी राज्यातील मुस्लीम, शीख, ख्रिस्ती, बौद्ध, पारसी व जैन या अल्पसंख्याक समाजातील १ ली ते १० वी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. केंद्र सरकारच्या या मॅट्रिकपूर्व शैक्षणिक शिष्यवृत्तीच्या २०१६-१७ या शैक्षणिक सत्रासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आवश्यक पात्रता-
अर्जदार विद्यार्थी खालीलप्रमाणे पात्रताधारक असायला हवेत-
* उमेदवार वर नमूद केलेल्या अल्पसंख्य समाजातील व राज्यातील शासनमान्य शैक्षणिक संस्थांमध्ये १ ली ते १० वीचे शिक्षण घेणारे असायला हवेत.
* इयत्ता १लीचे विद्यार्थी सोडल्यास इतरांनी गेल्या वर्षीच्या परीक्षेत कमीत कमी ५०% गुण मिळविलेले असावेत.
* अर्जदारांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न वार्षिक १ लाखाहून अधिक नसावे.
* एका कुटुंबातून २ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही.
* या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इतर शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळू शकणार नाही.
* यापूर्वी सदर शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिष्यवृत्ती योजनेचे नूतनीकरण करण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scholarships from directorate of government of maharashtra minority and adult education
First published on: 29-08-2016 at 01:04 IST