आजच्या लेखामध्ये आपण सामान्य अध्ययन पेपर तीनमधील ‘सुरक्षा’ या घटकाची परीक्षाभिमुख र्सवकष तयारी कशी करावी याची चर्चा करणार आहोत. सुरक्षा या विषयाची व्याप्ती मोठी आहे, भारताला बाह्य़ व अंतर्गत सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. बाह्य़ सुरक्षा म्हणजे परकीय राष्ट्राकडून केल्या जाणाऱ्या आक्रमणापासून सुरक्षा करणे होय व अंतर्गत सुरक्षा म्हणजे देशाच्या सीमांतर्गत असणारी सुरक्षा ज्यामध्ये शांतता, कायदा आणि सुव्यवस्था व देशाचे सार्वभौमत्व अबाधित ठेवणे इत्यादी येते. भारतामध्ये अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी गृह मंत्रालयावर आहे आणि बाह्य़ सुरक्षेची जबाबदारी संरक्षण मंत्रालयावर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दीर्घकालापासून जम्मू आणि काश्मीर हे राज्य दहशतवाद आणि दहशतवादी कारवायाने ग्रासलेले आहे, तसेच ईशान्येकडील राज्ये घुसखोरी व वांशिक चळवळी, संघटित गुन्हेगारी, सीमेपलीकडून अवैधरीत्या होणारी नशिल्या पदार्थाची तस्करी इत्यादी समस्यांनी त्रस्त आहेत. सद्य:स्थितीमध्ये देशाच्या अनेक राज्यामध्ये दहशतवाद आणि दहशतवादी कारवाया घडत आहेत. धार्मिक दंगे, भाषिक वाद, राज्य-राज्यांतर्गत असणारे वाद, नवीन तंत्रज्ञान अर्थात मोबाइल, इंटरनेट, सोशल नेटवìकग साइट्सद्वारे एखाद्या विशिष्ट द्वेषपूर्ण विचारसारणीचा प्रसार करणे यांसारख्या घटना घडत आहेत. या समस्या देशाच्या विविधतेतील एकता आणि अखंडतेला बाधा पोहोचवत आहेत ज्यामुळे सामाजिक सलोखा आणि अंतर्गत सुरक्षेला प्रचंड आव्हान निर्माण झालेले आहे.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Security issue of country upsc exam
First published on: 07-12-2017 at 01:00 IST