नेहमीच्या चाकोरीपेक्षा वेगळा आणि नजीकच्या भविष्यात महत्त्वाच्या ठरू पाहणाऱ्या अशा काही करिअर पर्यायांपकी एक म्हणजे ‘साऊंड  इंजिनीअिरग’

Radio images of the Sun obtained by scientists pune news
शास्त्रज्ञांनी मिळवली सूर्याच्या रेडिओ प्रतिमा
crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
13 year old use Alexa to protect from money attack vrial
Alexa चा सर्वात भन्नाट उपयोग; १३ वर्षांच्या मुलीने जीव वाचवण्यासाठी दिली अशी कमांड की बघूनच व्हाल थक्क
Post on Mumbai woman seeking groom who earns at least Rs 1 crore goes viral
“मला करोडपती नवरा पाहिजे!” मुंबईची तरुणी शोधत्येय जोडीदार; अपेक्षा वाचून चक्रावले नेटकरी, Viral Post एकदा बघाच

साऊंड इंजिनीअिरग म्हणजे काय?

ध्वनीच्या वापराचे तांत्रिक ज्ञान, तसेच रेकॉìडग, एडिटिंग, मििक्सग सर्व प्रक्रियांतून ध्वनीचा कल्पक वापर करण्याचे तंत्रशुद्ध ज्ञान या करिअर शाखेत दिले जाते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करून आवाजाला आवश्यक त्या परिणामकारकतेने सादर करण्याचे, संगीताचे, कोणत्याही कलाविष्काराची श्रवणीयता वाढवण्याचे कसब साऊंड  इंजिनीअर्स बाळगून असतात. रेकॉर्ड प्रोडय़ुसर्स(ध्वनिमुद्रक) आणि म्युझिशिअन्स (संगीतकार) यांच्यासाठी या व्यक्ती फार महत्त्वाच्या असतात. ध्वनी किंवा संगीत विषयाची आवड असणाऱ्या व्यक्ती या पर्यायाचा, स्वत:च्या प्रगतीसाठी विचार करू शकतात.

कार्यक्षेत्र

मनोरंजन व्यवसाय, चित्रपट, माहितीपट, जाहिरात क्षेत्र, विविध आकाशवाणी वाहिन्या, दूरदर्शन वाहिन्या, रेकॉìडग स्टुडिओज, अ‍ॅनिमेशन, जाहिरात कंपन्या अशा क्षेत्रांतून या प्रशिक्षित व्यक्ती प्रगतीच्या संधी आजमावू शकतात.

वरील कार्यक्षेत्राचे प्रशिक्षण देणाऱ्या काही संस्था

  • फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूूट ऑफ इंडिया, पुणे येथे साऊंड रेकॉìडग, साऊंड डिझाइन विषयातील पदव्युत्तर पदविका शिक्षणक्रम चालवले जातात, http://www.ftiindia.com

 

  • नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फिल्म आणि फाइन आर्ट्स, कोलकाता http://www.niffa.org/sound ियेथे साऊंड रेकॉìडग आणि एडिटिंगचे सर्टििफकेट कोस्रेस चालवले जातात.
  • मुंबई म्युझिक इन्स्टिटय़ूट, मुंबई http://www.mumbaimusicinstitute.inc

खाली दिलेल्या संस्थांची नावे फक्त उदाहरणादाखल दिली आहेत, याव्यतिरिक्त मुंबई, पुणे येथून इतर काही संस्थांतूनही सदर विषयातील प्रशिक्षण दिले जाते.

वरील संस्थांमधून साऊंड इंजिनीअिरग विषयातील पदविका, प्रमाणपत्र अशा स्वरूपाचे शिक्षणक्रम राबविले जातात, संस्थेनुरूप प्रशिक्षण कालावधी वेगवेगळा असतो.

वेगळ्या वाटामध्ये पुढच्या आठवडय़ात जाणून घेऊया अभियांत्रिकीमधील नव्या संधीबाबत..