नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट- दुर्गापूर येथे उपलब्ध असणाऱ्या थर्मल पॉवर प्लँट इंजिनीअरिंगमधील पदविका अभ्यासक्रमासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
जागांची संख्या व तपशील- अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागांची संख्या ६२ असून त्यापैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता- अर्जदारांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल वा इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमधील पदविका चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
निवड पद्धती- अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात येईल.
अर्जासह पाठवायचे शुल्क– अर्जदारांनी आपल्या अर्जासह पाठवायचे प्रवेश शुल्क म्हणून ५७५ रु.चा एनपीटीआय, ईआर यांच्या नावे असणारा व दुर्गापूर येथे हेच असलेला डिमांड ड्राफ्ट पाठविणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व तपशील- अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १८ ते २४ जून २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी, एनपीटीआयच्या दूरध्वनी क्र. ०३४३- २२५४६२३७ वर संपर्क साधावा अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.nptidurgapur.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख-
संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे प्रवेश अर्ज दि हेड ऑफ इन्स्टिटय़ूट, नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट (ईस्टर्न रिजन), एनपीटीआय कॉम्प्लेक्स, सिटी सेंटर, दुर्गापूर- ७१३२१६ (प. बंगाल) या पत्त्यावर २५ जुलै २०१६ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thermal power plant engineering courses
First published on: 18-07-2016 at 01:25 IST