आजच्या लेखामध्ये आपण आधुनिक भारताच्या १८५७ ते १९४७ पर्यंतच्या कालखंडाचा परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारा सर्वागीण आढावा घेणार आहोत. सर्वप्रथम आपण या कालखंडाची थोडक्यात उकल करून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१८५७च्या उठावामुळे कंपनीची सत्ता संपुष्टात आलेली होती आणि भारतावर ब्रिटिश राजसत्तेचे थेट नियंत्रण प्रस्थापित करण्यात आलेले होते. हे सत्तांतर १८५८च्या भारत सरकारच्या कायद्याद्वारे झालेले होते. पण १९व्या शतकामध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी घडत होत्या. या शतकामधील शिक्षित भारतीयांनी पाश्चिमात्य शिक्षणाद्वारे प्राप्त केलेल्या विज्ञान व तत्त्वज्ञानाच्या आधारे, धार्मिक विश्वास, रिवाज व सामाजिक प्रथांची चिकित्सा करण्यास सुरुवात केलेली होती. प्रबोधन युगातील विचार, युरोपातील बौद्धिक विचारप्रवाह, विकास, इ. घटकांमुळे पाश्चिमात्य शिक्षण घेतलेल्या भारतीयांनी सामाजिक व धार्मिक सुधारणा हाती घेतल्या. या सुधारणांनी जातीप्रथा, अस्पृश्यता, सामाजिक आणि कायदेशीर भेदभाव यांसारख्या सामाजिक परंपरा आणि मूर्तिपूजा आणि अंधश्रद्धा यांसारख्या धार्मिक बाबींवर प्रहार करण्यास प्रारंभ केला. या सुधारणांना १९व्या शतकातील सामाजिक आणि धार्मिक चळवळी असे संबोधले जाते. या चळवळी पुरोगामी स्वरूपाच्या होत्या. या चळवळींचा उद्देश व्यक्तिगत समानता, सामाजिक समानता, विवेकवाद, प्रबोधन आणि उदारमतवाद यांसारख्या लोकशाही मूल्यांवर आधारित सामाजिक व्यवस्था प्रस्थापित करणे हा होता.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tips and tricks to prepare for upsc exam
First published on: 25-07-2017 at 04:22 IST