सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात स्वत:ची गाडी असणे वाहतुकीच्या दृष्टीने सोयीस्कर ठरते. काही वेळा गरज म्हणून नव्हे तर छंद म्हणूनही गाडी चालवली जाते. परंतु गाडी चालवताना वाहतुकीचे नियम लक्षात ठेवणे गरजेचे असते.

*   गाडीचे लायन्सस मिळवण्यासाठी योग्य प्रशिक्षकाकडून गाडी चालवणे शिकले पाहिजे. दुचाकीसाठी हा नियम लागू होत नाही, परंतु चारचाकीसाठी हे अनिर्वाय आहे. तसा कायदाच आहे.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा

*   गाडी चलविताना रस्त्याच्या डाव्या बाजूने अशा प्रकारे चालवावी, की आपल्यापेक्षा वेगात जाणाऱ्या इतर गाडय़ांना अडचण होणार नाही.

*   चार रस्त्यावर, वळणावर किंवा साधारण अरुंद पुलावर, चढण असलेल्या ठिकाणी समोरून येणारी वाहने दिसत नसतील अशा ठिकाणी ओव्हर टेक करू नये. जर एखादे वाहन आपणास ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न करीत असेल तर आपण आपल्या गाडीचा वेग कमी करून त्या गाडीस ओव्हर टेक करू द्यावे.

*   आपण छोटय़ा रस्त्यावरून मोठय़ा रस्त्यावर येत असाल तर मुख्य रस्त्यावरील वरील डाव्या व उजव्या बाजूंनी येणाऱ्या वाहनांना प्रथम जाऊ  द्यावे.

*   उजवीकडे वळण घेत असताना मुख्य रस्त्याच्या मध्यभागापर्यंत सरळ येऊन उजवीकडे वळण घ्यावे, जेणेकरून इतर वाहनांना अडथळा येणार नाही.

*   डावीकडे वळण घेत असताना डावीकडील रस्त्याच्या किंवा फुटपाथच्या शक्य तितक्या जवळून वळण घ्यावे.

*   अपंग किंवा अंध व्यक्ती रस्त्यावरून जात असल्यास वाहनाचा वेग कमी ठेवावा. तसेच त्यांच्यापासून जास्त अंतरावर वाहन न्यावे.

*   रस्त्यावर एखादी वरात, मिरवणूक अथवा मोर्चा निघत असल्यास वेगाने जाऊ नये. तसेच हॉर्न वाजवून ध्वनिप्रदूषण करू नये.