आजच्या लेखात आपण मूलभूत संख्याज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी या घटकाची चर्चा करणार आहोत. या घटकामध्ये नावाप्रमाणेच मूलभूत संख्याज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी हे दोन उपघटक आहेत. तयारीला सुरुवात करण्याआधी या दोन उपघटकातील फरक लक्षात घेणे गरजेचे आहे. मूलभूत संख्याज्ञान म्हणजे आपली संख्याची व त्यावरील केल्या जाणाऱ्या क्रियांशी असलेली ओळख. जसे की, बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार इ. याचप्रमाणे वरीलपकी एकापेक्षा अधिक क्रिया करावयास लागणारी पदावली दिली असल्यास कोणत्या क्रमाने क्रिया केल्या जातात हे उमेदवारास माहीत आहे काय? अशा प्रकारच्या संख्याज्ञानाची ही परीक्षा आहे. याच्या जोडीला संख्यारेषा व त्यावर आधारित संकल्पना, लसावि-मसावि, मूळ संख्या ओळखता येणे, घातांकाच्या रूपात असणाऱ्या संख्यावर गणितीय क्रिया करता येणे या सर्वाचा मूलभूत संख्याज्ञानात समावेश होतो. त्यातील काही घटक पुढीलप्रमाणे नसíगक संख्या व पूर्ण संख्या, सम, विषम व मूळ संख्या, एकचल समीकरणे, समचलन-व्यस्तचलन, घातांक.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या मूलभूत संख्याज्ञानाचा वापर रोजच्या आयुष्यातील प्रश्न सोडवताना करता येतो का? हे बुद्धिमत्ता चाचणी या घटकात तपासले जाते. जसे की, एखाद्या आयताकृती बागेला मी ५ फेऱ्या मारल्या व बागेची लांबी-रुंदी दिलेली असताना मी एकूण किती अंतर चालले हे काढायचे असल्यास परिमितीबरोबरच आलेल्या परिमितीला ५ ने गुणणे आवश्यक आहे, अशा किमान गणितीय संकल्पना स्पष्ट पाहिजेत. या उपघटकामध्ये छोटय़ा छोटय़ा प्रसंगांमध्ये गणितीय संकल्पना वापरून प्रश्न सोडवता येतो का? हे तपासले जाते. याचाच भाग म्हणून अनेक वेगवेगळ्या विषयांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यातील काही घटक पुढीलप्रमाणे- काळ व काम, काळ, वेग व अंतर, सरासरी, शेकडेवारी, गुणोत्तर व प्रमाण, व्याज, नफा व तोटा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc preparation prepare for upsc exam preparing for upsc ias preparation tips
First published on: 16-05-2017 at 03:59 IST