प्रस्तुत लेखमालेतून सामान्य अध्ययन पेपर-३ मधील अभ्यासघटकांवर आधारित समकालीन मुद्यांची चर्चा करणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सहस्त्रक विकास लक्ष्याची (MDGs) यशस्वी अंमलबजावणी केल्यानंतर जगभरातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या १९३ सदस्य देशांनी २०१५नंतरचा विकासाचा नवीन अजेंडा शाश्वत विकास लक्ष्यांच्या स्वरूपामध्ये तयार केला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या (Open Working Group – COWG)ने या संदर्भात बंधनकारक असणाऱ्या दस्तावेजाची (Outcome Document) निर्मिती केली. या दस्तावेजाचे शीर्षक ” The future we want” असे आहे. जून २०१२मध्ये पार पडलेल्या Rio+20 परिषदेनंतर जुल २०१४ मध्ये १७कलमी SDGs ची निर्मिती करण्यात आली. शाश्वत विकासाशी संबंधित आर्थिक विकास, सामाजिक समावेशन व पर्यावरण संरक्षण आदी मुद्यांवर यामध्ये भर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे SDGs ची यशस्वी पूर्तता करण्याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शाश्वत विकास लक्ष्ये (SDGs) वैश्विक पातळीवर लागू होणारी आहेत. या लक्ष्याची निर्मिती करताना प्रत्येक राष्ट्राची वास्तविकता, क्षमता, विकासाची पातळी, त्याच्या राष्ट्रीय धोरणांना व प्राधान्यांना विचारात घेतले आहे. ही लक्ष्ये परस्परांशी निगडित असल्याने त्यांची अंमलबजावणी एकात्मिक पद्धतीने करणे आवश्यक ठरते. शाश्वत उद्दिष्टे तीन वष्रे चाललेल्या संबंधित भागधारक व लोकांच्या पारदर्शक व सहभागात्मक प्रक्रियेचा परिणाम आहेत. २५ सप्टेंबर २०१५ ला पार पडलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकास परिषदेच्या शेवटी जगभरातील नेत्यांनी २०३०शाश्वत विकासाचा अजेंडा स्वीकारला. या अजेंडय़ातील १७ उद्दिष्टय़े पुढीलप्रमाणे –

१)     सर्व प्रकारच्या गरिबीचे निर्मूलन करणे.

२)     भूक संपवणे, अन्न सुरक्षा व सुधारित पोषणआहार उपलब्ध करून देणे आणि शाश्वत शेतीला प्राधान्य देणे.

३)     आरोग्यपूर्ण आयुष्य सुनिश्चित करणे व सर्व वयोगटातील नागरिकांचे कल्याण साधणे.

४)     सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करणे.

५)     लिंगभावाधिष्ठित समानता व महिला आणि मुलींचे सक्षमीकरण साधणे.

६)     पाण्याची व स्वच्छतेच्या संसाधनाची उपलब्धता सुनिश्चित करणे.

७)     सर्वाना अल्पखर्चीक विश्वासार्ह, शाश्वत आणि आधुनिक ऊर्जा साधने उपलब्ध करून देणे.

८)     शाश्वत, सर्वसमावेशक आर्थिक वाढ आणि उत्पादक रोजगार उपलब्ध करणे.

९)     पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती करणे, सर्वसमावेशक आणि शाश्वत औद्योगिकीकरण करणे आणि कल्पकतेला वाव देणे.

१०)    विविध देशांमधील असमानता दूर करणे.

११)    शहरे आणि मानवी वस्त्या, अधिक समावेशक, सुरक्षित, संवेदनशील आणि शाश्वत करणे.

१२)    उत्पादन आणि उपभोगाच्या पद्धती शाश्वत रूपात आणणे.

१३)    हवामान बदल आणि त्याच्या दुष्परिणामांना रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे.

१४)    महासागर व समूहांचे संवर्धन करणे तसेच त्यांच्याशी संबंधित संसाधनांचा शाश्वतपणे वापर करणे.

१५)    परिस्थितिकीय व्यवस्थांचा (Ecosystem) शाश्वत पद्धतीने वापर करणे. वनाचे शाश्वत व्यवस्थापन, वाळवंटीकरणाशी मुकाबला करणे, जमिनीचा कस कमी होण्याची प्रक्रिया आणि जैवविविधतेची हानी रोखणे.

१६)    शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाजव्यवस्थांना प्रोत्साहन देणे. त्यांची शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल निश्चित करणे, सर्वाची न्यायापर्यंत पोहोच स्थापित करण्यासाठी विविध पातळ्यांवर परिणामकारक, उत्तरदायी आणि सर्वसमावेशक संस्था उभ्या करणे.

१७)    चिरस्थायी विकासासाठी वैश्विक भागीदारी निर्माण व्हावी यासाठी अंमलबजावणीची साधने विकसित करणे.

१७ लक्ष्ये व १६९ उद्दिष्टांसह SDGs ची व्याप्ती अधिक आहे. यामध्ये शाश्वत विकासाचे महत्त्वपूर्ण आयाम असणाऱ्या आíथक विकास, सामाजिक समावेशन व पर्यावरण संवर्धन यांचा अंतर्भाव होतो. S MDGs च्या यशस्वी अंमलबजावणीच्या पाश्र्वभूमीवर ह्य़ा नवीन जागतिक SDGs द्वारे विषमता, आíथक वाढ, रोजगार, शहरे व मानवी वस्त्या, औद्योगिकीकरण, ऊर्जा, हवामान बदल, शांतता व न्याय या बाबींचे समाधान होणे अपेक्षित आहे. SDGsवैश्विक आहेत, जगातील सर्व देशांना लागू असल्याने MDGs पेक्षा ते अधिक सर्वसमावेशक आहेत. MDGs ची व्याप्ती विकसनशील देशापुरती मर्यादित होती.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc preparations
First published on: 27-12-2016 at 01:11 IST